नाशिक मनपा 'या' कामात राज्यात अव्वल

नाशिक मनपा
नाशिक मनपा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्य शासनाने (state government) राज्यभरात बांधकामाच्या परवानग्या (Construction permits) या ऑनलाईन (online) ऐवजी ऑफलाईन (Offline) केल्याने कामाची गती वाढली असून, शासनाने दिलेले उद्दीष्ट पूर्ण करणे सहज शक्य होणार असल्याचे दिसून येत आहे.

मार्च अखेरपर्यतच्या तीन महिन्याच्या काळासाठी राज्य शासनाने बांधकाम परवानग्या (Construction permits) ऑफलाईन देण्याचे निर्देश दिले आहेत. प्रामुख्याने ऑनलाईन प्रणालीतील काही गुणदोष दूरुस्त करुन ती प्रणाली निर्दोष करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येत असल्याने शासनाद्वारे हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मनपाच्या उत्पन्नात वाढ होणार असून, त्यामाध्यमातून मनपाने दिलेले उद्दीष्ट पूर्ण करण्यात मदतच होणार आहे.

प्रत्यक्षात मनपाच्या (Municipality) उद्दीष्ट पूर्तीत एप्रिल ते जानेवारी दरम्यान मान्यता दिलेल्या 4970 प्रकरणांमुळे नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation) राज्यातील इतर महानगरपालिकेंच्या तुलनेत अव्वल स्थानावर आहे. यंदा जानेवारी महिन्यापर्यंत नाशिक मनपाला 135 कोटी रुपयांच्या उद्दीष्टाच्या 70 टक्के उद्दीष्ट पूर्ण केले आहे.

त्यामुळे यंदा मार्च अखेरपर्यंत हे उद्दीष्ट पूर्ण होण्याची शक्यता आहे. पूणे, मुंबई, धूळे, जळगाव, मालेगाव परिसरातील नागरीकांनी नाशिकला सेकंड होम संकल्पनेत घर खरेदी करण्यावर भर दिलेला आहे. त्यामुळे तयार होणार्‍या घरांच्या पटीत मागणी वाढू लागल्याने नाशिकच्या अर्थकारणाला गती मिळू लागलेली असल्याचे दिसून यत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com