Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यापथविक्रेत्यांना लाभ देण्यात नाशिक मनपा राज्यात अव्वल

पथविक्रेत्यांना लाभ देण्यात नाशिक मनपा राज्यात अव्वल

नाशिक | प्रतिनिधी Nashik

पीएम स्वनिधी योजनेमुळे ( PM Self Fund Scheme )पथविक्रेते खर्‍या अर्थाने आत्मनिर्भर झाले असून करोना काळानंतर त्यांना सावरण्याबरोबर बळ देण्याचे काम या योजनेमुळे झाल्याने मत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाँ. भारती पवार यांनी व्यक्त केले आहे. ही योजना यशस्विरीत्या राबवणा-या एनयूएलएम विभागाचे त्यांनी कौतुकही केले.

- Advertisement -

नाशिक महापालिकेच्या वतीने आतापर्यंत पंधरा हजार दोनशे पदविक्रेत्यांना एकूण 16 कोटी 66 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. सुमारे 85 टक्के कर्ज वाटप झाले असून आता केंद्राकडून उद्दिष्ट वाढविण्यात आले आहे. स्वनिधी ते समृद्धी या योजनेद्वारे केंद्राच्या आठ योजनांचा पथविक्रेत्यांना लाभ देण्यात नाशिक मनपा राज्यात प्रथम तर जास्तीत जास्त कर्ज वितरणात नाशिक मनपा राज्यात दुस-या क्रमांकावर आहे.

महोत्सवासाठी राज्यातील तीन शहरांची निवड करण्यात आली होती. यामध्ये नाशिक शहराचा समावेश करण्यात आला होता. त्या अनुषंगाने आज विशेष कार्यक्रम घेऊन तो साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त नाशिक महापालिकेचा पीएम स्वनिधी महोत्सव आज (दि.31) महाकवी कालिदास कलामंदिरात उत्साहात साजरा करण्यात आला.केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी उत्कृष्ट काम करणा-या पाच पथविक्रेत्यांचा सत्कार करण्यात आला. पथविकेत्यांना परिचय बोर्डाचे वाटप करण्यात आलेे.

स्वनिधी योजने अंतर्गंत काम करणा-या बँकांच्या प्रतिनिधींचाही सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना कर्जाच्या धनादेशाचंही वाटप करण्यात आलेे. स्वनिधी योजनेवर महापालिकेने तयार केलेला आणि एमओएचयूएकडून प्राप्त लघुपट दाखवण्यात आले. विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पथविक्रेत्यांना स्वच्छता, वाहतूक शिस्तबाबत सूचना केल्या. मनपा आयुक्त डाँ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ‘स्वनिधी से समृद्धी’ योजनेतील आठ योजनांचा उल्लेख करुन भविष्यातही ही योजना सक्षमपणे सुरू राहणार असे सांगितले.

आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने 9 ऑगस्टला सकाळी 11 वाजता सर्वांनी राष्ट्रगीत म्हणायचे आहे. तसेच 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज लावावा, असे आवाहन आयुक्तांनी केले. एनयूएलएमच्या उपायुक्त करुणा डहाळे यांनी दोन वर्षांत उद्दिष्ट कसे यशस्विरीत्या पूर्ण केले. अंमलबजावणी कशी केली याबाबत माहिती दिली. आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, नाशिक माहिती विभागाचे उपसंचालक ज्ञानेश्वर इगवे आदि मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या