Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यापावसाळ्यासाठी मनपा सज्ज; आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले 'हे' आदेश

पावसाळ्यासाठी मनपा सज्ज; आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ आदेश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिका (Nashik NMC) हद्दीत आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) योग्य पद्धतीने व्हावे, या दृष्टीने महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार (Ramesh Pawar) यांनी कडक भूमिका घेतली आहे…

- Advertisement -

नाशिक शहरात होणाऱ्या पावसाची (Rain) माहिती सिंचन विभागाकडून (Irrigation) महापालिकेला वेळोवेळी मिळत राहावी, तसेच शहरातील सर्व सहा विभागातील विभागीय अधिकाऱ्यांनी पावसाळ्यात फिल्डवरच राहावे, असे आदेश आयुक्त पवार यांनी दिले.

पावसाळा सुरू झाला असून नाशिकमध्ये दोन वेळा जोरदार पावसाची हजेरीदेखील झाली आहे. या काळात नेहरूचौक, दहीपुल या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यानंतर महापालिका आयुक्तांनी महापालिका प्रशासनाला पावसाळ्यात अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

बैठकीत त्यांनी सर्व विभागीय अधिकाऱ्यांना सूचना करताना पावसाळ्यात आपण सर्वांनी आपापल्या विभागात फिल्डवर रहावे, लोकांशी संपर्कात राहावे, सर्व प्रकारच्या सूचना तसेच जनजागृतीची कामे देखील सतत करण्यात यावी, आदी सूचना केल्या.

सिंचन विभागाला पत्र देणार

नाशिक शहरात विविध ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रणा सिंचन विभागाच्या वतीने लावण्यात आली आहे. यामुळे शहरात कोणत्या भागात किती पाऊस पडला, किती मिलिमीटर पाऊस झाला याचा अंदाज येतो.

मात्र ही माहिती नाशिक महापालिका प्रशासनाला मिळत नाही. यामुळे महापालिका प्रशासन आता सिंचन विभागाला पत्र देऊन पाऊस बाबतची सर्व प्रकारची माहिती सतत अपडेट करण्याची मागणी करणार आहे.

त्याचप्रमाणे धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या देखील सूचना महापालिकेपर्यंत पोहोचण्यात यावे, जेणेकरून किती पाणी सोडण्यात येणार आहे व कधी सोडण्यात येणार आहे. याबाबतची माहिती देखील महापालिका मिळावी असेदेखील पत्रात नमूद केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या