Saturday, April 27, 2024
Homeनाशिकमुंबई, पुणे पाठोपाठ नाशिक मनपा लस खरेदी करणार

मुंबई, पुणे पाठोपाठ नाशिक मनपा लस खरेदी करणार

नाशिक

मुंबई, पुणे महानगरपालिकेने जागतिक टेंडर काढून लस खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता नाशिक मनपाने हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून टेंडरींग प्रक्रियेबाबत मुंबई, ठाणे, पुणे महापालिकेशी चर्चा केली जाणार आहे. महापालिका आयुक्त कैलास जाधव तसेच महापौर सतीश कुलकर्णी यांच्यात आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

या लोकांना कोरोना लसीसाठी ९ महिने थांबावे लागणार ? का जाणून घ्या

नाशिक शहराची लोकसंख्या सुमारे वीस लाख आहे. परंतु केंद्र आणि राज्य सरकारकडून लसींचा पुरेसा पुरवठा होत नसल्यामुळे थंड गतीने लसीकरण होत आहे. शहरात ५५ लसीकरण केंद्रे असून, या ठिकाणी लसीकरणासाठी रोज नागरिकांची झुंबड उडत आहे. केंद्र व राज्य सरकारकडून अनियमित लशींचा पुरवठा होत असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत दुसऱ्या दिवशी लसीकरण करायचे की नाही, याचा निर्णय महापालिकेला घेता येत नाही. यातून मार्ग काढण्यासाठी मुंबई व ठाणे महापालिकेच्या धर्तीवर लस खरेदी करता येईल का, याची चाचपणी सुरू केली आहे. या दोन्ही महापालिकांना ज्या दरामध्ये लशींचा पुरवठा झाला, त्याच दरात महापालिका खरेदी करणार आहे.
प्रथम कोविशील्ड व कोवॅक्सीन लसींसाठी टेंडर काढण्यात येईल. त्यानंतर केंद्राने मान्यता दिल्यास स्फुटनिक व्ही, फायझर या विदेशी लसींच्या खरेदीला प्राधान्य देण्यात येईल. कोविडची संभाव्य लाट तसेच लसीकरणात होत असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सर्वपक्षीय गट नेत्यांच्या बैठकीत लस खरेदीसाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या