Friday, May 10, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक मनपा आरक्षण : पुरुष आणि महिला ओबीसी व सर्वसाधारण महिलांचे असे...

नाशिक मनपा आरक्षण : पुरुष आणि महिला ओबीसी व सर्वसाधारण महिलांचे असे असेल प्रभागनिहाय आरक्षण

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेच्या वतीने नागरिकांचा मागास प्रवर्ग व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला यांची आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC)च्या १४ जागा तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) महिलांच्या १९ जा जागा आणि सर्वसाधारण महिलांच्या ३४ जागांची सोडत आज निघाली. आजच्या सोडतीनंतर इच्छुक आणखीनच येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी सक्रिय होणार आहेत.,…

- Advertisement -

असे आहे एकूण आरक्षण

नागरिकांचा मागास प्रवर्ग : (१४ जागा)

प्रभाग ४ ब, ३९ ब, २४ ब, २५ ब, २३ ब, ४२ ब, १५ ब,२२ब, ४१ ब, २० ब, ३५ ब, १४ ब, ४३ ब, २६ ब

Video : नाशिक मनपा आरक्षण सोडत; इथे पाहा कोणत्या प्रभागात कोणाला संधी

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला १८ जागा)

प्रभाग १५ ब, २० ब, २३ ब, २४ ब, २५ ब, ३९ ब, ४२ ब, ८ अ या जागांची थेट निवड झाली. उर्वरित दहा जागांसाठी आरक्षण सोडत झाली. त्यात प्रभाग ३३ अ, ३० अ, १० अ, १८ अ, १९ अ, २९ अ, ३८ अ, ३२ अ, २१ अ या जागांची निवड करण्यात आली.

यानंतर प्रभाग ५, ६, ९, १०, १३, १६, १७, १८, १९, २१, २९, ३०, ३१, ३२, ३३, ३६, ३७, ३८, ४० या १९ प्रभागातून १० चिठ्ठ्या काढावयाच्या होत्या. त्यातून नागरिकांचा मागास प्रवर्ग मधील दहा महिलांची निवड झाली.

अशी झाली सर्वसाधारण महिलांच्या जागांची निवड (एकूण जागा ३४)

सर्वसाधारण महिलांचे आरक्षणासाठी ३४ जागा निश्चित करण्यात आल्या. यामध्ये जिथे एकही जागी महिलांचे आरक्षण नाही अशा ठिकाणी महिलांची थेट जागा नेमण्यात आली. यामध्ये प्रभाग १ ब, ३ ब, ५ ब, ६ ब, १३ ब, १६ ब, १७ ब, २८ ब, ३१ ब, ३६ ब, ३७ ब, ४० ब, या जागा थेट नेमून देण्यात आल्या आहेत.

ज्या प्रभागात दोन जागा अराखीव असतील त्याठिकाणी एक महिला निवडणून देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. त्यानुसार अराखीव जागा असलेले प्रभाग : प्रभाग २ ब, ८ क, ९ ब, १० ब, १२ ब, १८ ब, १९ ब, २१ ब, २९ ब, ३० ब, ३२ ब, ३३ ब, ३८ ब हे आहेत.

यातून थेट नेमलेल्या २५ आहेत. तर उर्वरित ९ जागा सोडतीनुसार झाल्या. यात ४ क, ७ क, ११ क, १४ क, १५ क, २० क, २२ क, २३ क, २४ क, २५ क, २६ क, २७ क, ३५ क, ३९ क, ४१ क, ४२ क, ४३ क, ४४ क प्रभागातून सर्वसाधारण महिलांच्या ९ जागांची निवड करण्यात आली. त्यात प्रभाग १४ क, २७ क, १५ क, ३९ क, ४४ क, २३ क, २० क, ३५ क, ७ क यांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या