
नाशिक । Nashik
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह (OBC reservation) नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) निवडणुकीचा मार्ग आज सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मोकळा केला आहे. तसेच न्यायालयाने शासनाला निर्देश देत दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम (Election program) जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत...
नाशिक महापालिकेत यंदा अकरा नगरसेवकांची (corporators) वाढ होऊन नगरसेवक संख्या १२२ वरून १३३ वर जाणार आहे. तर महिला आरक्षणासह (Women Reservation) इतर आरक्षण यापूर्वीच प्रभाग निहाय झाले आहे. तर आता ओबीसी आरक्षण लागू झाल्याने आणखी १०४ प्रभागांमध्ये सुमारे ३६ प्रभाग राखीव होणार आहे. तर उद्या नाशिक महापालिकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
दरम्यान, या सर्व निवडणुका पावसाचा (Rain) अंदाज घेऊन होणार असल्यामुळे नाशिक महानगरपालिका निवडणूक (Election) देखील लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.