Video : १७१ पोलीस उपनिरीक्षक सेवेत दाखल; पाहा दैदिप्यमान सोहळा

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आजपर्यंतचा पोलीस (Police) खात्यातील अनुभव व गेल्या दहा महिन्यांतील प्रशिक्षण यांची सांगड घालून महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार असल्याचे मत पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य रजनिश सेठ (Rajnish Seth) यांनी व्यक्त केले…

महाराष्ट्र पोलीस अकादमीत (Maharashtra Police Academy) पोलीस उपनिरीक्षकांच्या (PSI) १२१ व्या दिक्षांत सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी १६० पुरुष व ११ महिला असे १७१ पोलीस उपनिरीक्षक सेवेत दाखल झाले.

यावेळी नवनिर्वाचित उपनिरीक्षकांना मार्गदर्शन करताना पोलीस महासंचालक रजनिश सेठ यांनी सांगितले की, यापूर्वी आपण पोलीस दलात कार्यरत असल्याने पोलीस दलातील कार्यपद्धतीची आपणांस निश्चितपणे माहिती आहे. महिला, बालक यांसह समाजातील कमजोर घटक पोलीसांकडे मोठ्या आशेने येत असतात त्यांना आवश्यक ती कायदेशीर मदत करा.

सर्वसामान्य जनतेशी आपली वर्तवणूक ही संवेदनशील असली पाहिजे. पक्षपाती वर्तन न करता न्यायपूर्ण वागणूक समाजातील प्रत्येक घटकाला द्या. गेल्या १० ते १५ वर्षांत सोशल मिडिया (social Media), व मीडियाच्या व्यापक प्रसारामुळे समाजात जनजागृती झाली आहे मात्र सोशल मिडियामुळे सामाजिक शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मतदेखील सेठ यांनी व्यक्त केले.

यावेळी सर्वोकृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून मानाची रिव्हॉल्वर या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने राजु विष्णु सांगळे (Raju Vishnu Sangle) या प्रशिक्षणार्थीस सन्मानित करण्यात आले.

तसेच अहिल्यादेवी होळकर कप वेस्ट ऑल राऊड वुमन कॅडेट इन द बॅच या पुरस्काराच्या मानकरी उर्मिला जालिंदर खोत (Urmila Khot) यांना गौरवण्यात आले. तसेच सुजित सुरेद्र पाटील (Sujit Patil) यांस द्वितीय सर्वोकृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणुन सन्मानित करण्यात आले.

यावेळी अपर पोलीस महासंचालक, (प्रशिक्षण व खास पथके), संजय कुमार, संचालक, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी, नाशिक राजेश कुमार, उपसंचालक, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी, नाशिक गिरीष सरदेशपांडे, उपसंचालक (प्रशिक्षण) महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी, नाशिक गौरव सिंग, पोलीस आयुक्त नाशिक शहर जयंत नाईकनवरे, विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र डॉ. बी. जी. शेखर, पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण सचिन पाटील आदी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *