नाशिकचा पारा 40 अंशांवर

उन्हाच्या झळा तीव्र; अघोषित संचारबंदी
नाशिकचा पारा 40 अंशांवर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्ह्यात उन्हाळ्याच्या तप्त झळा आता जाणवू लागल्या असून तापमानाचा पारा 40.2 अंशांवर पोहोचला आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे दुपारी कामधंदा करणे अशक्य होत आहे. कालपासून नाशिककर घामाघूम होऊ लागले आहेत. दुुपारी 12 ते सायंकांळी 5 पर्यंत रस्त्यांवर अघोिेषत संचारबंदीसारखे वातावरण पाहावयास मिळत आहे.

जिल्ह्यातील 112 प्राथमिक आरोग्य केंद्रे, तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात एक उषमाघात कक्ष स्थापन झाला आहे. या वातानुकूलित कक्षात पाणी, प्राथमिक कीट, थंडावा निर्माण करणारी फळे यांचा समावेश केला आहे.

बसस्टँड, रेल्वे स्टेशन, बाजारपेठा, धार्मिक ठिकाणे, बँका, पेट्रोल पंप, मुख्य रस्ते आदी सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जात े आहे. उन्हाचा पारा वाढत असल्याने अंगाची काहिली होऊ लागली आहे. उन्हामुळे लहान मुले आजारी पडत असून काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

ऊन वाढू लागल्याने पाण्याचा बाटल्या, फळांचा रस, उसाचा रस, ताकविक्रेत्यांंचा धंदा चांगलाच वधारला आहे. दिवसभर उन्हात फिरणारे फळांचा रस, ताक किंवा बर्फाचे गोळे, आईस्क्रीम, खाणे पसंत करत आहेत. ऊन्हापासून संरक्षणासाठी स्कार्फ, टोपी आवर्जून घातली जात आहे. उन्हाळ्यात आजारी पडणार्यांची संंख्याही वाढत आहे.

या दिवसात लहान बालकांंना इच्छेनुसार पाणी पाजावेे. त्यांना सुती किंवा जाळीदार कपडे घालावे. ऊन्हात फिरायला नेऊ नये, असे डॉ. राहुल सावंंत यांंनी सांगितले. कडाक्याच्या उन्हाळ्यात गालगुंड, नागीण, कांजण्या, सर्दी-खोकला, कावीळ, उलट्या-जुलाबचे काही रुग्ण वाढतात. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com