Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यागुलाबी थंडीची चाहूल; नाशिकचा पारा 13 अंशावर

गुलाबी थंडीची चाहूल; नाशिकचा पारा 13 अंशावर

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत बरसलेल्या परतीच्या पावसाने (rain) उघडीप आता नाशिककरांना गुलाबी थंडीची (cold) चाहूल लागली आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरातील किमान तापमानात घट (decrease in minimum temperature) होऊ लागली आहे.

- Advertisement -

आज नाशिकचे (nashik) किमान तापमान 13 अंश सेल्सीअस तर कमाल तापमान (temperature) 30 अंश सेल्सीअस होते. थंडी जाणवू लागल्याने उबदार कपडे (Warm clothes) विक्रेत्यांचे तिबेटीयन मार्केटही (Tibetan Market) गजबजु लागले आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरातील किमान तापमानात घट आहे. आता कमाल तापमान घसरण होत गेल्यास थंडीचा जोर आणखी वाढेल.

पहाटे पांडवलेणे, चामांर लेणी भागांमध्ये धुकेही (fog) दिसत आहे. थंडीमुळे (cold) नागरिकांमध्येही उत्साह जाणवत आहे. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायामावर भर देत आहेत. दिवाळीत थंडी असली तरच खरा आनंद मिळतो. दिवाळीच्या गरमागरम पदार्थाची चव त्यामुळे वाढते. त्या थंंडीची प्रतीक्षा सर्वांना होती, ती आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या