Monday, April 29, 2024
HomeUncategorizedमुंबईत मराठ्यांचा एल्गार; नाशिकमधून कार्यकर्त्यांची मोठी फौज आझाद मैदानावर दाखल

मुंबईत मराठ्यांचा एल्गार; नाशिकमधून कार्यकर्त्यांची मोठी फौज आझाद मैदानावर दाखल

नाशिक | प्रतिनिधी Nashik

मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या आमरण उपोषणासाठी छावा क्रांतीवीर सेनेसह नाशिकमधील मोठ्या संख्यने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. येथील आझाद मैदानावर हे बांधव दाखल झाले असून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी याठिकाणी होत आहे….

- Advertisement -

छावा क्रांतिवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष हिरे व शहर अध्यक्ष योगेश गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा समाजाचे पदाधिकारी मुंबईकडे रवाना झाले होते. विशेष म्हणजे नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या बांधवांमध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय आहे.

संभाजी राजे आज उपोषणाला बसले आहेत. त्यांना आम्ही विनंती केली होती. शेवटी सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्णय आहे, त्याची अंमलबजावणी करायची आहे. संभाजी राजे यांच्या मागण्यांवर राज्य सरकार काम करत असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे.

शेकडो कार्यकर्ते आज पहाटेच्या सुमारास नाशिकहून मुंबईकडे रवाना झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या