नाशकात 'या' दहा उत्सवांसाठी रात्री 12 पर्यंत लाऊड स्पिकर्सला परवानगी

नाशकात 'या' दहा उत्सवांसाठी रात्री 12 पर्यंत लाऊड स्पिकर्सला परवानगी
file photo

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 या वर्षातील जिल्ह्यातील दहा प्रमुख उत्सवांसाठी ध्वनीची मर्यादा राखून सकाळी 6.00 वाजेपासून ते रात्री 12.00 वाजेपर्यंत लाऊडस्पिकर्स वाजवण्याची मुभा देण्यात आली आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे (Collector Suraj Mandhare) यांनी आज दिली....

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या (central forest environment ministry) ध्वनी प्रदुषण (Noise pollution) नियमन व नियंत्रणाच्या सुधारीत नियमानुसार, ध्वनीक्षेपक (Loud Speakers) व ध्वनीवर्धक वापराबाबत श्रोतेगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंदिस्त जागांव्यतिरिक्त इतर ठिकाणी जिल्ह्याच्या गरजेनुसार वर्षामध्ये जास्तीत जास्त 15 दिवस निश्चित करून सकाळी 6.00 वाजेपासून ते रात्री 12.00 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे.

यानुसार जिल्हास्तरावर 2022 या वर्षातील ध्वनीची विहित मर्यादा राखुन सणोत्सवांच्या काळात दहा दिवसांसाठी रात्री 12.00 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक सुरू ठेवता येणार असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले आहे.

यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शासकीय जयंती उत्सव (Chhatrapati Shivaji Maharaj Government birth anniversary festival), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (Dr Babasaheb Ambedkar birth anniversary), गणपती उत्सव (Ganesh Festival), गणपती आरास पाहण्यासाठी प्रत्येकी एक दिवस, गणेश विसर्जण (Ganesh Immersion Day) मिरवणूकीसाठी प्रत्येकी एक दिवस

नवरात्री उत्सव (Navratri), दसरा (dussehra), ईद-ए-मिलाद (eid e milad) , लक्ष्मीपूजन (laksmipoojan diwali 2022) दिवाळीसाठी एक दिवस, ख्रिसमस नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी एक दिवसाचा यात समावेश आहे.

या दिवशी असेल रात्री बारा वाजेपर्यत मुभा

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com