Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनाशिक लॉकडाऊन : बांधकाम क्षेत्र, हॉटेल सुरु राहणार का?

नाशिक लॉकडाऊन : बांधकाम क्षेत्र, हॉटेल सुरु राहणार का?

नाशिक

नाशिक जिल्ह्यांत येत्या १२ ते २२ मे या काळात अत्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. त्यासंबंधीचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी काढले आहेत. या काळात बांधकाम क्षेत्र व हॉटेलसंदर्भात काय नियम आहेत, जाणून घेऊ या.

- Advertisement -

नाशिक लॉकडाऊन : लसीकरणाचे काय होणार? लस घेता येईल का?

१२ मे दुपारी १२ वाजेपासून लॉकडाऊन सुरु होणार आहे. या दरम्यान हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, मद्यविक्री केंद्रे बंद असतील. परंतु त्यांना घरपोच पार्सल सेवा देता येईल. सकाळी 07.00 ते दुपारी 12.00 व सायंकाळी 5.00 ते 07.00 वाजेपर्यंत ही केंद्र सुरु राहील. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास या आस्थापनांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

शिव भोजन थाळी केंद्र सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत सुरु राहील व तेथून केवळ पार्सलद्वारे अन्नपदार्थ वितरित होतील. तेथे बसून भोजन करणे प्रतिबंधित राहील. याबाबतीत पर्यवेक्षणाची जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकारीऱ्यांची राहणार आहे.

बांधकाम क्षेत्राचे काय असणार?

सर्व प्रकारची बांधकामे केवळ इन सिटू पद्धतीने सुरू राहतील. इन सिटू पद्धतीने म्हणजे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणीच कामगारांना ठेवावे लागणार आहे. बांधकामे इन सिटू पद्धतीने करतांना ॉकमीत कमी मनुष्यबळाचा वापर करावा लागणार आहे. तसेच कामगारांची भोजन व्यवस्था कामाचे ठिकाणी अथवा नजीकच्या ठिकाणी करावी लागणार आहे. या सर्व मनुष्यबळाचे दर दहा दिवसानंतर रॅपिड एंटीजन टेस्ट करणे देखील अनिवार्य राहील. याबाबत सनियंत्रण करण्याची जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची असणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या