Monday, April 29, 2024
Homeनाशिकगर्दी कायम : नाशिकमधील मुख्य बाजारपेठेसह उपनगर गजबजली

गर्दी कायम : नाशिकमधील मुख्य बाजारपेठेसह उपनगर गजबजली

नाशिक

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर नाशिक शहर व परिसरातील बहुतांश दुकाने सुरू झाली. त्यानंतर शहर व उपनगरांमध्ये गर्दी कायम आहे.

- Advertisement -

नाशिककरांनी बाजारपेठांमध्ये एकच गर्दी केली आहे. शहरतील मेन रोड, रविवार कारंजा, एम.जे.रोड भागात, पंचवटी तर सकाळी ११ वाजता वाहतूक ठप्प झाली. शहरातील सर्वच बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी आणि रस्त्यांवर वाहनांच्या रांगा, वाहतूक ठप्प अशी परिस्थिती दिसून आली. बुधवारी शहरातील प्रमुख बाजारपेठांपैकी एक असलेल्या एमजीरोडवरील काही दुकानांवर पोलिस आणि महापालिकेने संयुक्त कारवाई करत दुकाने बंद केली.

बाजारातील गर्दीमुळे सोशल डिस्टशिंग व कोरोनाच्या नियमांना हरताळ फासली जात आहे. धडकी भरवणाऱ्या गर्दीमुळेच जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बुधवारी व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधला. नागरिकांना जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले. गर्दी करु नका, अत्यावश्यक गरज असेल त्याच वस्तूंची खरेदी करा, आपण नियमांचे पालन केले व कोरोनास अटकाव केल तर बाजार सुरुज राहणार असल्याचे सांगितले होेते. परंतु गर्दी केली तर शुक्रवारी रुग्णसंख्येबाबतचा आढावा घेऊन पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ येईल, असा इशारा दिला होता. मात्र, याचा कुठलाही परिणाम नाशिककरांवर झाला नसल्याचे दिसून आला नाही.

नाशिकरोड परिसरात गर्दी

निर्बंध शिथिल केल्यानंतर नाशिककरांनी रस्त्यावर गर्दी करण्याचा क्रम कायम ठेवला. यामुळे नाशिकराेड परिसरातील मुख्य चौकांत व बाजारात गर्दी कायम आहे. बिटकाे चाैकातील सिग्नल परिसरात देवळाली कॅम्पकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांची रांग लागत आहे.

नवीन नाशिकमध्ये गर्दी कायम

नवीन नाशिक

प्रतिनिधी :

नवीन नाशिक परिसरांमध्ये आजही नागरिकांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे दिसून आले. नवीन नाशकातील पवन नगर भाजी मार्केट, शिवाजी चौक भाजी मार्केट, त्रिमूर्ती चौक या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. या परिसरातील सर्वच आस्थापना सुरु झाल्यामुळे नागरिकांनी घरातील सामान खरेदेसाठी गर्दी केली. तसेच हॉकर्स झोनमधील देखील गाड्यांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. सध्या लॉकडाउन जरी उघडला असला तरी देखील करोनाची भीती कायम आहे. मात्र नागरिकांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्यामुळे पुन्हा एकदा करोनाचा धोका संभवू शकतो, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घाला

शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेता, बाजारपेठेत येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालावी, तसेच ठिकठिकाणी वाहनतळ निर्माण करावेत, अशी मागणी नाशिक़ रिटेल क्लॉथ मर्चेंट असोसीएशन संघटनेचे अध्यक्ष नरेश पारख यांनी केली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्ण संख्या आटोक्यात आल्याने शहरात अनलॉक करण्यात आले आहे, त्यामुळे बाजारपेठेतील बहुतेक सर्वच आस्थापना उघडल्या आहेत, शहराची मुख्य बाजातपेठ असलेल्या रविवार कारंजा,मेनरोड, महात्मा गांधी मार्ग, चांदवडकर लेन, शिवाजी रोड या परिसरात ग्राहक खरेदी साठी दुचाकी, चारचाकी वाहनाने येतात, त्यातच या परीसरात स्मार्ट सिटी ची कामे ही सुरू आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडी होते आहे, दुकानांमधून ग्राहक कमी असले तरी रस्त्यावर खूपच गर्दी होते, यावर तोडगा काढण्यासाठी पोलीस, पालिका प्रशासन यांनी मुख्य बाजारपेठेत दुचाकी, चारचाकी वाहनांना येण्यास बंदी घालावी, त्यामुळे वाहतूक कोंडी चा प्रश्न मार्गी लागेल, व ग्राहकांना ही मोकळे पणाने बाजारात फिरता येईल, तसेच करोनाचे नियम ही पाळले जातील, त्याचवेळी महाकवी कालिदास कलामंदिर, स्टेडियम कॉम्प्लेक्स, गाडगे महाराज पुलाखाली पार्किंग ची व्यवस्था करावी, म्हणजे मुख्य बाजारपेठेत वाहने न आल्याने वाहतूक कोंडी होणार नाही,आपल्या या मागणीचा पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त यांनी गांभीर्याने विचार करावा, व्यापारी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करत आहेत, पुढेही करतील, असेही पारख यांनी म्हटले आहे.

मेन रोडवर चारचाकींना बंदी घाला

नाशिक शहरातील मेन रोड, सराफ बाजार, महात्मा गांधीरोड भागात चार चाकी, रिक्षा, मोटार सायकल यांना बंदी करावयास करावी, अशी मागणी या परिसरातील दुकानदारांनी केली. हा परिसर फक्त वॉकिंग स्ट्रीट केले पाहिजे. त्यानंतरच या भागातील गर्दी कमी होण्यास मदत होईल, असे दुकानदार अशोक तिवारी यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या