'सर्वोच्च' सुनावणीकडे नाशिकच्या नेत्यांचे विशेष लक्ष

'सर्वोच्च' सुनावणीकडे नाशिकच्या नेत्यांचे विशेष लक्ष

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी राजकीय घटना मागील नऊ महिन्यांपूर्वी घडली होती.

शिवसेना (shiv sena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतील तब्बल 40 आमदारांना बरोबर घेऊन भाजपा (BJP) सोबत सत्ता स्थापन केली आहे. या नंतर पासून सत्ता संघर्षाची लढाई देशाच्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरू आहे.

दरम्यान उद्या 14 मार्च रोजी याबाबत निकाल येण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे स्थानिक पातळीवरील नेते कार्यकर्त्यांमध्ये देखील कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. नाशिक महापालिका (Nashik Municipality) निवडणूक (election) कधी लागणार हे अद्याप निश्चित नसले तरी प्रशासक राजवटीला आज 13 मार्च 2023 रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहे.

तर दुसरीकडे आगामी 2024 वर्षात होणाऱ्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) दृष्टीने देखील नाशिक हे हॉटस्पॉट ठरले आहे. नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन्ही आमदार, तसेच नाशिक लोकसभेचे खासदार मुख्यमंत्री शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्यासोबत गेले आहे. सध्या नाशिक जिल्ह्यावर शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चांगलीच पकड झाल्याचे दिसून येत आहे.

पालकमंत्री, खासदार, दोन्ही आमदार तसेच नाशिक शहरातील महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते, माजी नगरसेवक प्रवीण तिदमे तसेच सुमारे दीड डझन वजनदार नेते शिंदे यांच्यासोबत काम करीत आहे. मध्यंतरी निवडणूक आयोगाने (Election Commission) निर्णय देताना शिवसेना नाव तसेच चिन्ह धनुष्यबाण देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाला दिल्यामुळे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. अशा वातावरणात उद्या सत्ता संघर्षावर देशाच्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. त्यामुळे शिवसेनेसह उद्धव ठाकरे गटाचे विशेष लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.

परिणाम स्थानिक पातळीवर

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसह नाशिक महापालिकेच्या निवडणुकीवर देशाच्या सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीचा थेट परिणाम होणार आहे त्यामुळे नाशिक मधील शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटातील मोठ्या नेत्यांचे लक्ष याकडे लागले आहे.

संख्या आमची जास्त लोकशाहीमध्ये अंकगणिताला महत्त्व आहे तसेच संख्येला देखील महत्त्व आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असून आम्हाला न्याय देतेवर संपूर्ण विश्वास आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे जनतेचे असून जनतेच्या भल्यासाठी काम करीत आहे व करीत राहणार आहे. विकास हाच आमचा मुख्य मुद्दा आहे.

- अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख, शिवसेना नाशिक

ठाकरेच ब्रँड निवडणूक आयोगाने निकाल देताना शिवसेना नावासह धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले आहे, मात्र ब्रँड फक्त ठाकरेच ब्रँड आहे. ठाकरे नावावर चालणारा आमचा पक्ष असून आम्ही पुन्हा उभारी घेणार. सत्ताधाऱ्यांचा उत्साह हा क्षणिक आहे.

- विनायक पांडे, माजी महापौर तथा ठाकरे गटाचे नेते

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com