नाशिक आयटीआय बनणार राज्यातील पहिली 'मॉडेल आयटीआय'

नाशिक आयटीआय बनणार राज्यातील पहिली 'मॉडेल आयटीआय'

सातपूर | प्रतिनिधी | Nashik

नाशिक आयटीआयला (ITI) राज्यातील पहिली मॉडेल आयटीआय (Model ITI) बनण्याची प्रक्रिया सूरू करण्यात आली असून, प्राचार्य निरिक्षकांनी याचा पाठपूरावा करुन त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्नशिल राहण्याचे आवाहन राज्याचे व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे (State Directorates of Vocational Education and Training) संचालक दिगंबर दळवी (Director Digambar Dalvi) यांनी केले.

नाशिक आयटीआय येथे मॉडेल आयटीआय उभारण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली असून, त्याअंतर्गत विविध वर्कशॉपमध्ये (workshop) ट्रिमिक्स (Trimix) पध्दतीचे फ्लोरींग (flooring) करण्यास सूरूवात करण्यात आलेली आहे. या कामांची पहाणी काल संचालक दळवी यांनी केली. त्यानंतर श्री श्री रुरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व स्नायडर उद्योगाच्या (Sri Sri Rural Development Trust and Snyder Industries) माध्यमातून आयटीआय येथे घरातील वायरिंगच्या प्रशिक्षणासाठी लागणारी प्रयोगशाळा उभारण्यात आली असून, त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ‘ घरगुती वायरिंगचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या प्रयोग शाळेचा शुभारंभ श्री दळवी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ट्रस्टच्या वतीने विजय हाके यांनी हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक उद्योगांची थेट डिलरशिप उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले.

ओजेटी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप

तत्पूर्वी सकाळच्या सत्रात राज्याचे व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी यांच्या हस्ते एचएएल मध्ये ऑन जॉब ट्रेनिंग घेणार्‍या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

आयटीआयमध्ये होणार विमानासाठीच्या साहीत्य उत्पादनांचे प्रशिक्षण

राज्यातील नाशिकच्या या मॉडेल आयटीआय मध्ये ‘एरॉनॉटीकल स्ट्रक्चर अ‍ॅण्ड इक्विपमेंट फिटर’हा नवीन ट्रेड सूरू करर्‍यात येत असून, या कामाचे प्रशिक्षण देण्यासाठी जर्मनीचे तज्ज्ञ प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात आली असल्याचे दिगंबर दळवी यांनी सांगितले. या नव्या ट्रेडचा प्रारंभ नाशिक आयटीआय मधून केला जाणार असून, या माध्यमातून उच्चदर्जाची गुणवत्ता निर्माण करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे श्री दळवी यांनी सांगितले.

या कार्यक्रमात सहसंचालक प्रफुल्ल वाकडे, उपसंचालक मधूकर पाटील, आर.एस. मुंडासे,सहाय्यक संचालक डी.जी.जाधव, जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे प्रशिीण अधिकारी इंद्रजित काकड, प्रा राजेश मानकर, एचएएलचे डीजीएम, श्री सावळकर, उपप्राचार्य मोहन तेलंग आयएमसीचे अध्यक्ष सुधिर पाटीलआदींसह पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आरएस मुंडासे मोहन तेलंगी व श्री सावळकर यांन विशेष परिश्रम घेतले.

नाशिक आयटीआय हे मॉडेल आयटीआय बनवण्यात येत आहे. विमान क्षेत्राच्या अभ्यास क्रमाचा पहिल्यांदा समावेश करण्यात आलेला आहे. एचएएलनेही या क्षेत्रात भरिव मदत करावी.

- दिगंबर दळवी संचालक राज्य व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com