नाशिक पदवीधर निवडणूक : दुसऱ्या फेरीअंती सत्यजित तांबे 'इतक्या' मतांनी आघाडीवर

सत्यजीत तांबे
सत्यजीत तांबे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या (Nashik Graduate Constituency Election) मतमोजणीस (Vote Counting)आज सकाळी आठ वाजेपासून सुरूवात झाली होती. त्यानंतर सुरुवातीला मतपत्रिकांची छाननी करून वेगवेगळे गठ्ठे करत २८ टेबलांवर मतमोजणी सुरु आहे...

नाशिक पदवीधरमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्यामध्ये अटीतटीची लढत होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

मतमोजणीच्या एकूण पाच फेऱ्या होणार असून दुसऱ्या फेरी अंती सत्यजित तांबे तब्बल साडे चौदा हजार मतांनी आघाडीवर आहेत. मतमोजणीच्या सुरुवातीला टेबल नंबर १३ वर मतदार प्रतिनिधींची संख्या वाढल्याने गोंधळ झाला होता. मात्र, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Radhakrishna Game) यांनी तात्काळ पोलिसांच्या तुकडीला पाचारण करून दोन्ही बाजूच्या प्रतिनिधींना बाहेर काढले. त्यानंतर मतमोजणी सुरळीत सुरु झाली.

दुसऱ्या फेरीचा निकाल पुढील प्रमाणे

सत्यजित सुधीर तांबे : 31009

शुभांगी भास्कर पाटील : 16316

रतन कचरु बनसोडे : 1157

सुरेश भिमराव पवार : 360

अनिल शांताराम तेजा : 46

अन्सारी रईस अहमदअब्दुल कादीर : 100

अविनाश महादू माळी : 623

इरफान मो इसहाक : 28

ईश्वर उखा पाटील : 89

बाळासाहेब रामनाथ घोरपडे : 295

झुबेर नासिर शेख : 103

सुभाष राजाराम जंगले : 104

नितीन नारायण सरोदे : 129

पोपट सिताराम बनकर : 37

सुभाष निवृत्ती चिंधे : 83

संजय एकनाथ माळी : 76

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com