नाशिक पदवीधर निवडणूक : मतमोजणी केंद्रावर गोंधळ

नाशिक पदवीधर निवडणूक : मतमोजणी केंद्रावर  गोंधळ

नाशिक | Nashik

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या (Nashik Graduate Constituency Election) मतमोजणीस (Vote Counting) आज सकाळी आठ वाजेपासून सुरूवात झाली होती. सुरुवातील मतपत्रिकांची छाननी करण्यात आली. त्यानंतर मतपत्रिकांचे वेगवेगळे गठ्ठे करून २८ टेबलांवर ठेवण्यात आले असून मतमोजणीच्या एकूण पाच फेऱ्या होणार आहेत...

नाशिक पदवीधर निवडणूक : मतमोजणी केंद्रावर  गोंधळ
नाशिक पदवीधर निवडणूक : काँग्रेस, राष्ट्रवादीने प्रचार केला नाही? शुभांगी पाटील म्हणाल्या...

पहिल्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून यातील पहिल्या काही मतपत्रिकांचा अंदाज घेतला असता सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) आणि महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्यामध्ये अटीतटीची लढत होत असल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे.

त्यातच आता पहिल्या फेरीच्या सुरुवातीला टेबल नंबर १३ वर मतदार प्रतिनिधींची संख्या वाढल्याने गोंधळ झाल्याची माहिती समोर आली असून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Radhakrishna Game) यांनी तात्काळ पोलिसांच्या तुकडीला पाचारण करून दोन्ही बाजूच्या प्रतिनिधींना बाहेर काढले. त्यानंतर मतमोजणी सुरळीत सुरु आहे.

नाशिक पदवीधर निवडणूक : मतमोजणी केंद्रावर  गोंधळ
नाशिक पदवीधर निवडणूक : पहिल्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com