नाशिक पदवीधर निवडणूक : तिसऱ्या फेरीअंती सत्यजित तांबे 'इतक्या' मतांनी आघाडीवर

नाशिक पदवीधर निवडणूक : तिसऱ्या फेरीअंती सत्यजित तांबे 'इतक्या' मतांनी आघाडीवर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या (Nashik Graduate Constituency Election) मतमोजणीस (Vote Counting)आज सकाळी आठ वाजेपासून सुरूवात झाली होती. दरम्यान २८ टेबलांवर मतमोजणी सुरु आहे

नाशिक पदवीधरमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्यामध्ये अटीतटीची लढत होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. दरम्यान पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत सत्यजित तांबे आघाडीवर होते.

मतमोजणीच्या एकूण पाच फेऱ्या होणार असून तिसऱ्या फेरीची मतमोजणी नुकतीच पूर्ण झाली आहे. तांबे यांना तिसऱ्या फेरी अखेर 45660 तर पाटील यांना 24927 मते मिळालेत. तिसऱ्या फेरीअखेर तांबे 20739 मतांनी आघाडीवर आहेत.

तिसऱ्या फेरीचा निकाल पुढील प्रमाणे

सत्यजित सुधीर तांबे : 45660

शुभांगी भास्कर पाटील : 24927

रतन कचरु बनसोडे : 1713

सुरेश भिमराव पवार : 519

अनिल शांताराम तेजा : 70

अन्सारी रईस अहमदअब्दुल कादीर : 154

अविनाश महादू माळी : 1076

इरफान मो इसहाक : 45

ईश्वर उखा पाटील : 145

बाळासाहेब रामनाथ घोरपडे : 466

झुबेर नासिर शेख : 154

सुभाष राजाराम जंगले : 185

नितीन नारायण सरोदे : 171

पोपट सिताराम बनकर : 59

सुभाष निवृत्ती चिंधे : 117

संजय एकनाथ माळी : 123

वैध मते : 75622

अवैध मते : 8378

एकूण : 84000

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com