नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक: महाविकास आघाडीचा उमेदवार कोण ?

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नाशिक पदवीधर मतदारसंघ (Nashik Graduate Constituency) निवडणुकीचे (election) चित्र सोमवारी (दि.१६) माघारीनंतर स्पष्ट होणार आहे.

महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) उमेदवार नेमका कोण ? हे स्पष्ट झालेले नसताना, ठाकरे गटाच्या (Thackeray group) पाठिंब्यावर शुभांगी पाटील या निवडणुक रिंगणात उतरणार हे त्यांच्या मातोश्री भेटीने समोर आले आहे.

त्यामुळे काँग्रेस पक्षबरोबरच (Congress party) अपक्ष उमेदवार (Independent candidate) म्हणून अर्ज दाखल केल्याचे सांगणाऱ्या सत्यजित तांबे यांना महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) पाठिंबा मिळणार की नाही? हेही स्पष्ट होणार आहे. एकुणच चित्र पाहता पदवीधर मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध (Election unopposed) होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत (Nashik Graduate Constituency) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी गुरुवारी (दि.१२) एक मोठा ट्विस्ट आला.

काँगेसचे उमेदवारी जाहीर झालेले अधिकृत उमेदवार आणि विद्यमान आमदार डॉ.सुधीर तांबे (MLA Dr. Sudhir Tambe) यांनी शेवटच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. दुसरीकडे मात्र, सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी अपक्ष व काँग्रेसचे उमेदवार म्हणून आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, असे सांगितले आहे. मात्र, काँग्रेस सत्यजित तांबे यांना उमेदवारी वा पाठिंबा देण्यास अजूनही तयार नसल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (State President Nana Patole) यांनी स्पष्ट केले आहे.

यामुळे काँग्रेसमध्ये पर्यायाने महाविकास आघाडीमध्येच (Mahavikas Aghadi) घोळ सुरू असल्याचे चित्र आहे. यातून महाविकास आघाडीमधील म्हणजेच उद्धव ठाकरेंची शिवसेना (shiv sena), काँग्रेस (congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) या मित्र पक्षांमध्ये असलेला विसंवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

कोणाचा कोणाला पाठिंबा ?

ही निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नाही आणि भाजपने शेवटच्या क्षणी जी खेळी केलेली आहे ती आता यशस्वी होऊ द्यायचे नाही, म्हणून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्यावतीने धुळे जिल्ह्यातील उमेदवार शुभांगी पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र, महाविकास आघाडीच्यावतीने याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे शुभांगी पाटील यांची महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी ही सर्वमान्य होईल की नाही हेही लवकर स्पष्ट होणार आहे. एकूणच चित्र पाहता सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यातच आता सरळ लढत होणार हे आज स्पष्ट होणार आहे. मात्र, कोणाचा कोणाला पाठिंबा हे अजूनही गुलदस्तात आहे

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *