नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक : दोन शिक्षक संघटनांचा तांबे यांना पाठिंबा

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक : दोन शिक्षक संघटनांचा तांबे यांना पाठिंबा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

विधान परिषदेच्या( Vidhan Parishad ) नाशिक पदवीधर मतदारसंघासाठीहोणार्‍या निवडणुकीत सत्यजित तांबे (Satyajit Tambe )अपक्ष म्हणून निवडणूक (Election of Nashik Graduate Constituency ) रिंगणात उतरले आहेत. त्यांना मतदारसंघातून मिळणारा पाठिंबा वाढत आहे.

महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटना (मस्ट) आणि महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटना यांनी तांबे यांना निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. त्याबाबतचे पत्रही त्यांनी तांबे यांना दिले आहे. नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगावमधील सर्व पदवीधर मतदारांनी सत्यजित तांबे यांच्या नावासमोर 1 क्रमांक लिहून त्यांना निवडणुकीत प्रचंड बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन ‘मस्ट’ या संघटनेने केले आहे.

महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनेनेही सत्यजित तांबे यांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे. पदवीधरांना उच्चशिक्षित असलेल्या सत्यजित तांबे यांच्यात समस्यांचे निराकरण करणारा आशेचा किरण दिसत आहे. त्यांच्या विजयात आपलाही खारीचा वाटा असावा या उद्देशाने महाराष्ट्र खासगी शिक्षक संघटनेचा अध्यक्ष म्हणून तांबे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर करत आहे, असे मनीष गावंडे यांनी पत्रात म्हटले आहे. नाशिक विभागातील संघटनेचे पदाधिकारी, हितचिंतक आणि शिक्षक तांबे यांच्या विजयासाठी निष्ठेने काम करतील, असेही पात्रात म्हटले आहे.

सत्यजित तांबे यांचे वडील आ. डॉ.सुधीर तांबे यांनी या मतदारसंघाचे तीनवेळा प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी पदवीधरांच्या समस्या सोडवण्यासाठी मनापासून काम केले होते. कार्यकर्ते जोडण्याची त्यांची हातोटी त्यांचे पुत्र आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनीही आत्मसात केली आहे.तांबे यांचा कामाचा व पाठपुरावा करण्याचा आवाका मोठा आहे. त्यांनी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले आहे.

या काळात त्यांनी विविध कामे करून तरुणवर्गाला आपल्यासोबत जोडण्याचे काम केले होते. तेव्हापासून त्यांनी जोडलेले तरुण कार्यकर्ते किंवा पाठिराखे त्यांनी मनापासून जोपासले आहेत. त्यामुळे ते आजही राज्यातील तरुणांमध्ये लोकप्रिय युवा नेते म्हणून ओळखले जातात. डॉ. सुधीर तांबे यांनी मतदारसंघासाठी आजवर केलेली कामे आणि सत्यजित तांबे यांची महाराष्ट्रातील लोकप्रियता यामुळे त्यांना मिळणारा पाठिंबा वाढत आहे. दिवसागणिक तो अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com