Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याअखेरचा गणपती विसर्जित होईपर्यंत मिरवणूकीचा निर्धार; डीजेचाही दणदणाट

अखेरचा गणपती विसर्जित होईपर्यंत मिरवणूकीचा निर्धार; डीजेचाही दणदणाट

नाशिक | दि १६ प्रतिनिधी

दोन वर्षानंतर गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) निर्बंध मुक्त साजरा होणार आहे. यामुळे हा उत्सव साजरा जल्लोषात करण्यासाठी परवानगीच्या नावाखाली पालिकेसह पोलिसांनी मंडळाची अडवणूक केली जावू नये, अशी एकमुखी मागणी गणेशोत्सव महामंडळाच्या बैठकीत (Ganeshotsav Mahamandal Meeting) करण्यात आली….

- Advertisement -

आज (दि ०६) रोजी नाशिक महानगर गणेश उत्सव महामंडळाची बैठक कंसारा मंगल कार्यालय येथे समीर शेटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी राजेंद्र बागुल, गजानन शेलार, विनायक पांडे, रामसिंग बावरी, हेमंत जगताप, सत्यम खंडाळे, लक्ष्मण धोत्रे, बबलू परदेशी, गणेश बर्वे आदी पदाधिकाऱ्यांसह गणेशमंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

गणेशोत्सव ही आपली संस्कृती आहे त्यामुळे या उत्सव जल्लोषातच साजरा झाला पाहिजे. त्यादृष्टीने प्रत्येक गणेश मंडळाने तयारी सुरू केली आहे. मात्र, पालिका (NMC), पोलीस , वाहतूक (Transportation), महावितरण (MSEB) अशा विविध परवानगीसाठी पदाधिकाऱ्यांना कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात ते यंदा सहन करणार नाही.

गणरायाच्या आगमनाच्या 8 दिवसांपूर्वी शहरातील खड्डे बुजविले गेले पाहिजे. अन्यथा पालिका आयुक्तसह अधिकाऱ्यांना जाब विचारण्याच्या निर्णय घेण्यात आला. बैठकीत मंडळाकडून करण्यात आली.

गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav 2022) 15 दिवसापूर्वी सर्व पालिका व पोलिसांची परवानगी मिळावी. गणेश विसर्जन मिरवणूक निर्बंधमुक्त हवी. डिजे (DJ) वाजविण्याची परवानगी द्यावी अशा विविध मागण्या याप्रसंगी करण्यात आल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या