वादग्रस्त लाचखोर शिक्षणाधिकारी झनकर यांची संपत्ती लाखोंच्या घरात

वादग्रस्त लाचखोर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ वैशाली वीर (Dr vaishali Zankar vir) फरार झाल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनी (police) त्यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या नावावर मालमत्ता बघून पोलिसही आवाक झाले आहेत.

१७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय रद्द

डॉ. झनकर (Dr vaishali Zankar vir) यांच्या नावे शहरातील शिवाजीनगर भागात, गंगापूर रोड मुरबाड, गंधारे कल्याण असे प्रत्येकी एक याप्रमाणे चार फ्लॅट तसेच सिन्नरमध्ये 0.57 गुंठे, कल्याण येथील मिलिंदनगरमध्ये 31.70 गुंठे, 10.8 गुंठे, 40.80 गुंठे, 13.10 गुंठे तर सिन्नरमध्ये 0.56 गुंठे, 3.41 गुंठे, 22.70 गुंठे अशी एकूण सुमारे 123.64 गुंठे अर्थात सर्व मिळूण एकूण 3 एकर अशी स्थावर मालमत्ता आढळून आली. तसेच 40 हजारांची रोख रक्कम, एक होंडा सिटी कार आणि अ‍ॅक्टिव्हा दुचाकी अशी वाहने पोलिसांना आढळून आली आहेत. ही संपत्ती बघुन पोलिसही आवाक झाले आहेत.

घराच्या झाडाझडतीत अधिकाऱ्यांनी एसबीआय, बँक ऑफ बडोदा, सिटी युनियन बँक, पंजाब नॅशनल बँकेसह इत्यादी बँकांचे पासबुक जप्त केलेत. याच दरम्यान पथकानं शासकीय चालक ज्ञानेश्वर सूर्यभान येवले, प्राथमिक शाळेतील शिक्षक पंकज रमेश दशपुते यांच्याही घराची झडती घेतली.

८ लाखांची घेतली होती लाच

८ लाखांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ वैशाली झनकर (Nashik Higher secondary education officer Dr vaishali Zankar vir) यांचा चालक आणि एक शिक्षकास ताब्यात घेतले होते. तब्बल आठ त्यास या दोघांची चौकशी रात्री सुरु होती. पहाटेला भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, डॉ झनकर यांना सकाळी आठ वाजता भद्रकाली पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र याठिकाणी त्या हजर झाल्या नाहीत. यानंतर दोघा संशयितांना पोलिसानी आज दुपारी न्यायालयासमोर हजर केले. यावेळीही डॉ झनकर हजर राहिल्या नाहीत त्यामुळे त्या कुठेतरी पसार झाल्या आहेत.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *