शिक्षणाधिकारी डॉ झनकर नातेवाईकांच्या गराड्यात; पोलिसांची बघ्याची भूमिका

शिक्षणाधिकारी डॉ झनकर नातेवाईकांच्या गराड्यात; पोलिसांची बघ्याची भूमिका

नाशिक | प्रतिनिधी Nashik

लाखचोर प्रकरणातील संशयित आरोपी डॉ वैशाली झनकर (Education Officer Dr Vaishali Zankar Veer) यांची प्रकृती खालावल्याने काल (दि १७) जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल (Nashik Civil Hospital) करण्यात आले. उच्च रक्तदाबाचा (Blood Pressure) त्रास होत असल्याने आज (दि.१८) त्यांना अधिक तपासणी साठी संदर्भ रुग्णालयात (Sandarbha Seva Hospital Nashik) नेण्यात आले.

शिक्षणाधिकारी डॉ झनकर नातेवाईकांच्या गराड्यात; पोलिसांची बघ्याची भूमिका
डॉ. झनकर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल

दरम्यान, त्यांच्या भोवती त्यांचे पती आणि इतर नातेवाईकांनी ( Dr Zankar relative in Civil) गराडा घातल्याचे दिसून आले. रुग्णवाहिकेपर्यंत डॉ. झनकर व्हिलचेयरवर आल्या. मात्र, त्यानंतर त्या स्वतः उभ्या राहून रुग्णवाहिकेमध्ये चढल्याने उपस्थित आश्चर्यचकित झाल्याचे यावेळी दिसून आले.

डॉ झनकर यांच्यासोबत असलेले पोलीसही यावेळी बघ्यांच्या भूमिकेत दिसले. दरम्यान, डॉ झनकर यांना काल (दि. १८ ) रोजी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.

वकिलांनी केलेला अंतरिम जामिनासाठी अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर त्यांची रवानगी थेट सेंट्रल जेलला होणार होती. मात्र, जामीन फेटाळल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडी कायम राहिली. याच वेळी अचानक प्रकृती खालावली आणि त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यावेळी अचानक तब्बेत कशी खालावली असावी असाही प्रश्न उपस्थित होत असून यावर तर्कवितर्कांना उधान आलेले पहावयास मिळाले.

शिक्षणाधिकारी डॉ झनकर नातेवाईकांच्या गराड्यात; पोलिसांची बघ्याची भूमिका
बारावीच्या गुणपत्रिका शनिवारपासून मिळणार

Related Stories

No stories found.