लाचखोर शिक्षणाधिकारी डॉ. झनकरला पोलिस कोठडी

लाचखोर शिक्षणाधिकारी डॉ. झनकरला पोलिस कोठडी

नाशिक :

शैक्षणिक संस्थाचालकांच्या शिक्षकांकडून ९ लाख रुपयांची लाच (bribe) घेताना रंगेहाथ पकडलेल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी (zp education officer) डॉ. वैशाली झनकर-वीर (vaishali zankar) या फरार झाल्या होत्या. अखेरी त्यांना आज अटक करण्यात आली. त्यानंतर दुपारी न्यायालयात त्यांना हजर केले असता त्यांना एका दिवशाची पोलिस कोठडी दिली. सहआरोपी ज्ञानेश्वर येवले आणि पंकज दशपुते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

रात्री महिलेस अटक करता येत नाही यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने डॉ. झनकर यांच्या नातलगांचे हमीपत्र घेत डॉ. झनकर यांना घरी सोडले होते. मात्र त्या पोलीस ठाणे तसेच न्यायालयात हजर झाल्या नव्हत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या फरार झाल्या.

लाचखोर शिक्षणाधिकारी डॉ. झनकरला पोलिस कोठडी
वादग्रस्त लाचखोर शिक्षणाधिकारी झनकर यांची संपत्ती लाखोंच्या घरात

सकाळी ११.३० च्या सुमारास त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयातून वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णायलयात नेण्यात आले. यावेळी जिल्हा रुग्णालयातील बंदोबस्त वाढवण्यात आला. वैद्यकीय तपासणी झाल्यावर दुपारुन त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

काय आहे प्रकरण

संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २० टक्के अनुदानाप्रमाणे ३६ शिक्षकांचे नियमीत वेतन सुरु करण्याचा कार्यादेश काढून देण्याच्या मोबदल्यात झनकर यांनी प्राथमिक शिक्षक पंकज आर. दशपूते यांच्या मार्फत तक्रारदारांकडे प्रत्येकी २५ हजार याप्रमाणे ९ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यामुळे तक्रारदारांनी याची माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. विभागाने सापळा रचून मंगळवारी सायंकाळी सुरुवातीस चालकास पैसे घेताना रंगेहाथ पकडले होते.

भद्रकाली पोलीस स्थानकात चौकशी करून त्यांना सूर्यास्तानंतर अटक करता येत नाही या नियमानुसार त्यांना उद्या हजर होते या हमीवर सोडण्यात आले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी त्या हजर न झाल्याने त्यांना फरारी घोषित करण्यात आले होते. मात्र, आज (दि.१३) सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना सकाळी त्यांच्या भावाच्या घरातून अटक केली आणि न्यायालयात हजर केले. ‘

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com