Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यालसीकरणात नाशिक विभागाचा विक्रम

लसीकरणात नाशिक विभागाचा विक्रम

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

करोना लसीकरणात Corona Vaccination महाराष्ट्राने 9 कोटी 43 लाख 21 हजार लसमात्रांचा टप्पा पार केला आहे. तसेच नाशिक विभागाला Nashik Division पुरेसा लससाठा वेळोवेळी प्राप्त झाल्यामुळे आजपर्यंत नाशिक विभागात तब्बल 1 कोटी 29 लाख 34 हजार 893 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे Divisional Commissioner Radhakrishna Game यांनी दिली.

- Advertisement -

देशात 16 जानेवारी 2021 रोजी करोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस देणे सुरू झाले. प्रथम आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर व नंतर 1 मे 2021 पासून सर्व 18 वर्षावरील व्यक्तींना हे लसीकरण सुरू झाले. सुरुवातीला जनतेचा मनातील संभ्रम व लसीची भीती यामुळे डोस घेण्याचे प्रमाण जरी कमी असले तरी लस सुरक्षित व लाभदायक असल्याचे समजल्यामुळे हळूहळू लसीकरण करून घेण्यासाठी रांगा लागत असल्याचे चित्र अनेक शहरात अनेकदा दिसून आले. लसीकरण करून घेणार्‍यांचे प्रमाणदेखील जनजागृतीमुळे वाढत गेले. सर्वत्र लसीचे डोस पुरेश्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागले.

विविध प्रसिध्दी माध्यमे, वृत्तपत्रे, लोकप्रतिनिधी व आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने लसीचे मोफत डोस घेण्याचे प्रमाण वाढत जाऊन या जागतिक कोरोना महामारीपासून संरक्षण करण्यात मोठे यश आलेले आहे. नाशिक विभागातील 5 जिल्ह्यांसाठी वेळोवेळी आज अखेर कोव्हॅक्सिन 15,99,370 डोसेस आणि कोविडशिल्ड 1,17,61,820 डोसेस शासनाकडून प्राप्त झाले आहेत. या दोन प्रकारच्या लसीचे एकूण 1,33,61,190 डोसेस प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आजअखेर विभागात 1,29,34,893 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात आजपर्यंत 9 कोटी 43 लाख 21 हजार लसीकरणाचे डोसेस दिलेले असून 18 वर्षे वरील वयोगटात 70% पहिला डोस व 29% दुसरा डोस पूर्ण केले आहेत. त्यात नाशिक विभागाचा विक्रमी वाटा आहे. नाशिक विभागात तब्बल 1,29,34,893 डोसेस देऊन करोना महामारीस संरक्षक ठरेल असे लसीकरण झाले आहे. यासाठी आरोग्य विभागास जनतेचा व लोकप्रतिनिधींचा सहभागामुळेच इतके लसीकरण पूर्ण करणे शक्य झाले आहे. पुढेही असाच चढता आलेख राहील, असा आरोग्य यंत्रणेस विश्वास आहे.

नाशिक जिल्ह्यात Nashik District एकूण 45 लाख 12 हजार 691 जणांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये 32 लाख 90 हजार 262 जणांनी पहिला डोस घेतला असून 12 लाख 22 हजार 429 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात Ahmednagar District एकूण 32 लाख 52 हजार 514 जणांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये 24 लाख 10 हजार 016 जणांनी पहिला डोस घेतला असून 08 लाख 42 हजार 498 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

धुळे जिल्ह्यात Dhule District एकूण 14 लाख 32 हजार 592 जणांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये 09 लाख 79 हजार 876 जणांनी पहिला डोस घेतला असून 04 लाख 52 हजार 716 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

जळगाव जिल्ह्यात Jalgaon District एकूण 27 लाख 09 हजार 94 जणांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये 20 लाख 36 हजार 779 जणांनी पहिला डोस घेतला असून 06 लाख 72 हजार 315 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात Nandurbar District एकूण 10 लाख 28 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये 07 लाख 710 जणांनी पहिला डोस घेतला असून 03 लाख 27 हजार 292 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

नाशिक विभागाने मिशन कवच कुंडल यशस्वी राबविले असून त्याचेच फलित म्हणून आपण विभागात विक्रमी लसीकरण टप्पा गाठू शकलो आहोत.लसीकरणाचे महत्वाचे दोन फायदे-लसीकरणामुळे कोरोनाने होणार्‍या मृत्यू दरात घट अन कोरोना झाला तरी दवाखान्यातील वास्तव्य कमी होऊन आजाराचे सौम्य स्वरूप हे अनेक आजवर झालेल्या विविध संशोधनात पुढे आले आहे.

पुढील काळात लवकरच उर्वरित लाभार्थ्यांना कोरोना लसीचे दोन डोस देऊन संरक्षित करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केलेले आहे. येत्या 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2021 या कालावधीत सर्व उर्वरित तरुण युवक युवतींना करोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. मिशन युवा स्वास्थ्य ही मोहीम मिशन स्वरूपात राबविली जाणार आहे. त्याचे सुक्ष्म कृती आराखडा आखणे सुरू झाले असून त्यात आरोग्य यंत्रणेला शाळा, महाविद्यालयांचा सक्रिय सहभाग अपेक्षित असल्याचेही, गमे यांनी सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या