लाचखोरीत नाशिक विभाग अव्वल

लाचखोरीत नाशिक विभाग अव्वल

तीन महिन्यात 58 लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक विभागात गत 3 महिन्यात तब्बल 38 लाचखोरीचे सापळे यशस्वी करून 58 लाचखोरांना अटक करण्यात राज्यातील लाच लुचपत प्रतिबंधकच्या सहाही विभागात नाशिक पहिल्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाच्या अधीक्षकपदाची जबाबदारी शर्मिष्ठा वालावलकर यांनी स्वीकारल्यापासून अधिक गतीने काम होत असल्याचे दिसून येत आहे. नाशिक नंतर पुण्याचा नंबर लागतो. पुण्यात 35 सापळे यशस्वी झाले आहे.

नाशिक एसीबी विभागात जवळपास दिवसाआड कारवाई होत असून यामुळे लाचखोरांचे धाबे दणाणले आहे. भ्रष्टाचारावर अंकुश आणण्यासाठी शासनाच्याच गृहविभागाच्या अंतर्गत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहे. सुरुवातीला साइडबॅच म्हणून समजला जाणारा हा विभाग आता आपल्या धडक कारवायांमुळे चर्चेत आहे. या विभागाकडून वर्षभरात वेगवेगळ्या कार्यालयात वर्ग एकपासून ते वर्ग चारपर्यंतच्या कर्मचार्‍यांवर साधारणपणे 100 ते 120 सापळे यशस्वी केले जात होते.

मात्र, आता या विभागाकडून 62 दिवसांत तब्बल 49 सापळे यशस्वी करण्यात यश आले. तर 1 जानेवारी 2023 ते 16 मार्च 2023 या काळात 38 सापळे यशस्वी झाले असून 38 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर तब्बल 58 आरोपींना जेरबंद करण्यात यशस्वी झाले आहे. अधीक्षक वालावलकर यांनी पदभार स्वीकारल्यापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील नाशिकसह धुळे, जळगाव, नंदूरबार व अहमदनगर जिल्ह्यात पथकाकडून कारवाईचा धडाकाच लावल्याचे दिसून येत आहे.

कामं अडली गरज पडली तर फक्त एक फोन करा, हेल्पलाईन क्रमांक 1064 असे आवाहन लाच लुचपत विभागाच्या वेबसाईटवरून करण्यात येत असतो. त्यामुळे अनेक तक्रारदार या फोन क्रमांकावर फोन करून आपली तक्रार नोंदवतात.

अडीच महिन्यातील कारवाईचा विभागनिहाय तक्ता

नांदेड - 10

ठाणे - 22

पुणे - 35

नागपूर -20

अमरावती -18

मुंबई -8

छत्रपती संभाजीनगर -30

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com