Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक विभागाला 'इतक्या' कोटींची नुकसान भरपाई

नाशिक विभागाला ‘इतक्या’ कोटींची नुकसान भरपाई

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गेल्या ऑगस्ट (August) आणि सप्टेंबर (September) महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Crop Damaged due to heavy rain) बाधित झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दोन हजार आठशे कोटी ८४ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यातील नाशिक विभागाला (Nashik Division) ९१८ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे…

- Advertisement -

राज्यात दोन महीन्यात लाखो शेतक़र्‍यांना अतीवृष्टाची झळ बसली हाती. त्यात नाशिक जिल्ह्यातील एक लाख 71 हजार 867 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. (Crop Damaged) सव्वा दोन लाख शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला होता. त्यांंच्या मदतीसाठी शासनाकडून 147 कोटी 21 लाख 33 हजार रुपयांची अपेक्षा जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली होती.

पावसाने भुईमूग, बाजरी, कापूस, मका, मूग,भात, मठ या पिकांचेही अतोनात नुकसान झाले . जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकर्‍याच्या हातातोंडाशी आलेले पीक पावसाने हिरावून नेले.

जिल्ह्यात एक लाख 41 हजार शेतकर्‍यांंनी पिकविमा काढला (Crop insurance). बाकी शासनाच्या मदतीवर अवलंबुन होते. शासन मदतीकडे त्यांचे लक्ष्य लागले होतेे. कृषीमंत्री दादा भुसे (Agriculture minister dadaji bhuse) यांंनी ही दिवाळी पुर्वी मदत दिली जाईल अशी घोषणा केली होती.

त्यानंतर कालच त्याबाबतचा आादेश निर्गमीत झाला आहे. त्यात 2 हजार 860 कोटी 84 लाखाची मदत दिल्याचे स्पष्ट केले आहे. त्यात नाशिक विभागाला 918 कोटीचा निधी मिळाला आहे. तो लवकरच शेतक़र्‍यांंच्या खात्यावर जमा केला जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या