Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँक निवडणूक बिनविरोध

नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँक निवडणूक बिनविरोध

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

नाशिक जिल्हा महिला विकास सह.बँक लि..नाशिक (Nashik District Women’s Development Co. Bank Ltd.)यांची पंचवार्षिक निवडणूक ( Election ) २०२२ ते २०२७ ची प्रक्रिया सुरु असून मा.राज्य मंत्री डॉ.प्रशांत हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.आ.डॉ.अपूर्व हिरे यांच्या नेतृत्वाने आज माघारीचे शेवटची मुदत असताना या मध्ये उभे असलेले संपूर्ण उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

- Advertisement -

महिला राखीव गटातून बँकेच्या विद्यमान चेअरमन डॉ.योगिता अपूर्व हिरे,माजी नगरसेविका पल्लवी स्वप्नील पाटील या बिनविरोध निवडून आल्या.

अनुसूचित जाती जमाती गटातून अर्चना अमित कोथमिरे,इतर मागास प्रवर्गातून पूनम दीपक साळवे ,भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून रेखा बबनराव साळवे तर सर्वसाधारण गटातून रोहिणी संजय मराठे,माजी नगरसेविका शीतल संजय भामरे,कविता गोरख शिंदे,स्वाती पवन ठाकरे,सुनंदा भास्कर घडवजे,सारिका विनोद चव्हाण,वैशाली संदीप पवार,उर्मिला अशोक खांदे,अंजली गौरव गोवर्धने,जोती सचिन पिंगळे आदींची देखील बिनविरोध निवड झाल्याने समस्त बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून आनंद व्यक्त करण्यात येत असून विविध मान्यवरांच्या वतीने सर्व पॅनल मधील उमेदवारांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या