नाशिक जिल्ह्यात 'इतक्या' लाख घरांवर फडकणार तिरंगा

नाशिक विभागातील ३८ लाख ५१ हजार घरांवर फडकणार तिरंगा
तिरंगा
तिरंगाIndian flag

नाशिक । Nashik

भारतीय स्वातंत्र्याला ( Indian independence) ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. या भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नाशिक विभागात (Nashik Division) १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ‘हर घर झेंडा’ (Har Ghar Zenda) उपक्रम राबविण्यात येणार आहे. नाशिक विभागातील शहरी व ग्रामीण भागातील घरांची एकूण संख्या ३८ लाख ५१ हजार ६५१ इतकी असून या प्रत्येक घरांवर तिरंगा फडकविण्यासाठी नियोजन करण्यात येऊन उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Divisional Commissioner Radhakrishna Game) यांनी संबंधित यंत्रणांना केले आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने नागरिकांच्या मनामध्ये स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृति तैवत रहाव्यात, या लढ्यातील क्रांतिकारक तसेच अज्ञात नायकांच्या घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे. तसेच प्रखर देशभक्तीची भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने आपल्या वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर झेंडा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे.

नाशिक विभागातील नागरी भागात एकूण १० लाख ६२ हजार ५७८ घरे आहेत. नाशिक विभागातील ग्रामीण भागात एकूण २७ लाख ८९ हजार ७३ घरे आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने पाचही जिल्ह्यांना एकूण ७ लाख ६६ हजार ३६९ झेंडे पुरविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

नाशिक जिल्ह्यात (Nashik district) १२ लाख ०५ हजार २८८ घरांवर फडकणार तिरंगा

नाशिक महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात ४ लाख २५ हजार २४० घरांची संख्या असून तितकेच झेंडे फडकविण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागातील घरांची संख्या ७ लाख ८० हजार ४८ इतकी असून तितकेच झेंडे फडकविण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर ९ लाख ५ हजार २८८ झेंडे उपलब्ध होणार असून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून ३ लाख झेंडे पुरविण्यात येणार आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar District) ०८ लाख ९९ हजार ६६६ घरांवर फडकणार तिरंगा

अहमदनगर महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात घरांची संख्या १ लाख ९६ हजार ९०५ असून तितकेच झेंडे फडकविण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागातील घरांची संख्या ७ लाख २ हजार ७६१ इतकी असून तितकेच झेंडे फडकविण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर ७ लाख ८० हजार ५७७ झेंडे उपलब्ध होणार असून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून १ लाख १९ हजार ८९ लाख झेंडे पुरविण्यात येणार आहेत.

जळगाव जिल्ह्यात (Jalgaon District) ९ लाख ६५ हजार ३९१ घरांवर फडकणार तिरंगा

जळगाव महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात घरांची संख्या २ लाख ८५ हजार २३५ असून तितकेच झेंडे फडकविण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागातील घरांची संख्या ६ लाख ८० हजार १५६ इतकी असून तितकेच झेंडे फडकविण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर ७ लाख ६५ हजार ७२७ झेंडे उपलब्ध होणार असून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून १ लाख ९९ हजार ६६४ लाख झेंडे पुरविण्यात येणार आहेत.

धुळे जिल्ह्यात (Dhule district) ४ लाख ०२ हजार ११९ घरांवर फडकणार तिरंगा

धुळे महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात घरांची संख्या १ लाख ८ हजार ९१४ असून तितकेच झेंडे फडकविण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागातील घरांची संख्या २ लाख ९३ हजार २०५ इतकी असून तितकेच झेंडे फडकविण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर २ लाख ७३ हजार ५०३ झेंडे उपलब्ध होणार असून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून १ लाख २८ हजार ६१६ लाख झेंडे पुरविण्यात येणार आहेत.

नंदूरबार जिल्ह्यात (Nandurbar District) ३ लाख ७९ हजार १८७ घरांवर फडकणार तिरंगा

नंदूरबार नगरपालिका क्षेत्रात घरांची संख्या ४६ हजार २८४ असून तितकेच झेंडे फडकविण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागातील घरांची संख्या ३ लाख ३२ हजार ९०३ इतकी असून तितकेच झेंडे फडकविण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर ३ लाख ६० हजार १८७ झेंडे उपलब्ध होणार असून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून १९ हजार झेंडे पुरविण्यात येणार आहेत.

हर घर तिरंगा’ अभियानाच्या यशस्वीतेसाठी प्राधिकृत सनियंत्रण प्रणाली

‘हर घर तिरंगा’ अभियानाबाबतची प्राधिकृत सनियंत्रण प्रणाली (SOP) तयार करण्यात आलेली असून त्यानुसार झेंड्यांचे वितरण सुरळीतपणे करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. डोनेशन पध्दतीने देखील मोठ्या प्रमाणात जिल्हास्तरावर झेंडे उपलब्ध करून घेणेबाबतची मोहिम राबविली जात आहे.

२४ तास फडकणार तिरंगा

भारतीय ध्वजसंहितेमध्ये ३० डिसेंबर, २०२१ च्या आदेशान्वये काही प्रमाणात दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यानुसार पॉलीस्टर व यंत्राव्दारे तयार करण्यात आलेले झेंडे लावण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच सदर अभियानामध्ये झेंडा फडकविल्यानंतर तो दिवस व रात्र २४ तास फडकविण्यात येणार आहे. हे अभियान १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान विभागात यथोचितपणे राबविण्यात येणार आहे.

कापड मिल, महिला बचत गट व स्थानिक विक्रेते यांच्याकडून जिल्हास्तरावर ध्वज उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. IEC च्या माध्यमातून सदर अभियान राबविण्याबाबतची जनजागृती करण्यात येत आहे. शाळा व महाविद्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस विभाग व स्वस्त धान्य दुकानदार यांच्यामार्फत अभियान यशस्वी करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

सर्व शासकीय व नियम शासकीय यंत्रणांनी व्यापक प्रमाणात जाणीव जागृती मोहीम या उपक्रमासाठी प्रभावीपणे राबवावी. स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यंत्रणा, शाळा व महाविद्यालय, परिवहन, आरोग्य केंद्र, स्वस्त धान्य दुकाने, सहकारी संस्था अशा सर्वसामान्य नागरिकांशी निगडित यंत्रणांचा वापर करून हर घर झेंडा हा उपक्रम यशस्वीपणे राबवावा, असेही गमे यांनी यावेळी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com