Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकमधील 'या' धरणांमधून होतोय 'इतका' विसर्ग; वाचा सविस्तर

नाशिकमधील ‘या’ धरणांमधून होतोय ‘इतका’ विसर्ग; वाचा सविस्तर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पाऊस (Rain) सुरु होता. अजूनही जिल्ह्यातील काही भागात पाऊस कायम आहे तर काही भागात पावसाने (Rain) काहीशी उघडीप घेतली आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धरणसाठ्यात वाढ झाली आहे. तर गंगापूर धरणाची (Gangapur Dam) पाणी पातळी सुमारे ४० टक्क्यांहून अधिक वाढली आहे…

- Advertisement -

हवामान विभागाने (IMD) दि. १४ जुलैपर्यंत नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट (Red Alert) घोषित केले आहे. यामुळे पावसाची (Rain) तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या दृष्टीने प्रशासन आवश्यक पाऊले उचलत आहेत. अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सध्या दारणा धरणातून (Darna Dam) १५, हजार ८८ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे तर कादवा धरणातून (Kadwa Dam) ६ हजार ७१२ क्युसेस विसर्ग होत आहे.

गंगापूर धरणातून (Gangapur Dam) कालपासून १० हजार ३५ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला असून अहिल्याबाई होळकर पुलाखालून (Ahilyabai Holkar Bridge) १४ हजार १९१ विसर्ग होत आहे.

दुसरीकडे नांदुरमध्यमेश्वर धरणातून (Nandurmadhyameshwar Dam) जायकवाडीकडे ७८ हजार २७६ क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. तसेच आज सकाळी दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड धरण (Ozarkhed Dam) आणि वाघाड धरण (Waghad Dam) ओव्हरफ्लो झाले आहे. मुकणे, वालदेवी, आळंदी या धरणांमधून आतापर्यंत विसर्ग सुरु करण्यात आला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या