Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यादहिपूल परिसरात एकाचा खून; चौघांकडून लाकडी दांड्याने मारहाण

दहिपूल परिसरात एकाचा खून; चौघांकडून लाकडी दांड्याने मारहाण

नाशिक |प्रतिनिधी

मूळ नेपाळचा रहिवासी असलेल्या एका ४१ वर्षीय व्यक्तीचा लाकडी दांडक्याने मारहाण करून खून करण्यात आल्याचा प्रकार सोमवारी (दि २९) मध्यरात्री दहीपूल भागात घडला.
हिला हिरालाल प्रजापती (४०, मुळ रा. नेपाळ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

- Advertisement -

दोन ते तीन अज्ञात हल्लेखोरांनी प्रजापती यांना लाकडी दांंड्यानी जबर मारहाण करून गंभीर जखमी केले…

यामुळे त्यांचा मृत्यू झाला त्यामागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रजापति यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयातदाखल केले. तत्पुर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून घोषित केले.

शहरात आठवडाभरात हा दुसरा खून झाला आहे. २० सप्टेंबरला रात्री उपनगर पोलीस ठाणे हद्दीत सराईत गुंडाची टोळीयुध्दातुन गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

दरम्यान, प्रजापती यांच्या खुनाच्या घटनेनंतर हल्लेखोरांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरु होता तसेच याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हा खून आर्थिक व्यवहार तसेच अन्य कोणत्या कारणातून झाला असल्याचा पेलीसांचा कयास आहे. भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या