Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्या...म्हणून नाशिक शहरातील कोविड केअर व हेल्थ सेंटर झाले रिकामे

…म्हणून नाशिक शहरातील कोविड केअर व हेल्थ सेंटर झाले रिकामे

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरातील करोना संक्रमणाला गेल्या चार पाच दिवसात अचानक ब्रेक लागला असुन काल (दि.27) शहरात केवळ 124 करोना रुग्ण आढळून आले. जुलै महिन्यातील रुग्णांची स्थिती शहरात निर्माण झाल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे…

- Advertisement -

या बदलामुळे आता महापालिकेच्या शहरातील बहुतांशी कोविड केअर व हेल्थ सेंटर रिकामे झाले असुन कोविड रुग्णालयातील रुग्ण देखील कमी झाले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या कोविड केअर व हेल्थ सेंटरमधील काही मनुष्यबळ कमी करण्यात आले असले तरी येथील सज्जता कायम ठेवण्यात आली आहे.

नाशिक शहरातील करोनाचा प्रभाव गेल्या 1 आक्टोंबर पासुन कमी होत जाऊन तो नवीन रुग्ण प्रति दिन 300 च्या आत राहिल्यानंतर आता हा आकडा दीडच्या आत आल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शहरात गेल्या 28 जुलै रोजी केवळ 122 करोना रुग्णाचा आकडा नोंदविला गेल्यानंतर हा आकडा सातत्याने वाढत गेला होता. आता रुग्णात मोठी घट झाली आहे. महापालिकेने करोनासाठी आरक्षित केलेल्या एकुण 4557 खाटांपैकी 3251 खाटा शिल्लक आहे. यातील महापालिका व खाजगी रुग्णालयातील कोविड केअर सेंटर बहुतांशी रिकामे झाले आहे. अशीच स्थिती शहरातील कोविड हेल्थ केअर सेंटर आहे.

असे असले तरी नोव्हेंबर महिन्यात देशात – राज्यात करोनाची दुसरी लाटेची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने महापालिकेकडुन करोना खाटासंदर्भातील सज्जता कायम ठेवली आहे. यापैकी महापालिकेकडुन कोविड केअर व हेल्थ सेंटर मधील मनुष्यबळ तुर्त काहीअंशी दुसरीकडे वापरले जात आहे.

बाहेरील यंत्रणेकडुन मनुष्यबळ हे पर्यायानुसार सोडुन देण्यात आले असुन स्थिती लक्षात घेऊन ते पुन्हा बोलविण्यात येणार आहे. मात्र महापालिकेकडुन करण्यात आलेली सज्जता कायम असल्याची माहिती मनपा वैद्यकिय अधिकारी डॉ. बापुसाहेब नागरगोजे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या