Saturday, April 27, 2024
HomeनाशिकPhoto Gallery : नाशिकमध्ये करोना लसीकरणाचा 'ड्राय रन'

Photo Gallery : नाशिकमध्ये करोना लसीकरणाचा ‘ड्राय रन’

नाशिकरोड | प्रतिनिधी

नविन बिटको हॉस्पिटल कोविड केअर सेंटर मध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे प्रात्यक्षिक ड्राय रन महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या उपस्थितीत सुरु करण्यात आले…

नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडून सकाळी नाशिकमध्ये विविध ठिकाणी होणाऱ्या ड्राय रनची माहिती घेण्यात आली. याप्रसंगीचे छायाचित्रे (सर्व छायाचित्रे : सतीश देवगिरे)

आज आपला ड्राय रन अतिशय व्यवस्थित रित्या पार पडलेला आहे. मी स्वतः, महापालिका आयुक्त तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भेट देऊन समक्ष तशी खात्री केली. सर्वच व्यवस्था ही ऑनलाइन आहे. परंतु तरीसुद्धा गर्दीमध्ये काही गडबड होऊ नये याकरता अतिरिक्त सुरक्षेचा उपाय म्हणून आपण आपल्या जिल्ह्यामध्ये एक छोटेखानी टोकन देणार आहोत. ज्यामध्ये संबंधितचे नाव आधार नंबर वय असा तपशील नमूद असेल. हे टोकन एका कक्षातून दुसऱ्या कक्षात नागरिक जाईल तसतसे त्यावर टीक केली जात जाईल त्यामुळे सर्व बाबींची खात्री करूनच योग्य प्रकारे लसीकरण झाल्याची खात्री पटेल. तसेच त्या छोट्या टोकन वर पुढल्या लसीकरणची तारीख नमूद केली जाईल जेणेकरून जरी काही कारणाने त्या दिवशी त्याला एसएमएस आला नाही तरी ती तारीख लक्षात ठेवून ते नागरिक लसीकरणसाठी येतील. केंद्रावर एखाद्या नागरिकाला त्रास झाला तरी त्याला तातडीने आवश्यक ते उपचार देण्याकरता सर्व औषधे सुद्धा केंद्रावर उपलब्ध राहणार आहेत तसेच जास्त गंभीर स्वरूपाचा त्रास झाला तर ॲम्बुलन्स द्वारे त्याला दवाखान्यात पोहोचवण्याच्या दृष्टीने देखील नियोजन करण्यात आलेले आहे. इतरही सर्व बाबींचे अत्यंत सूक्ष्म नियोजन आपण केलेले आहे. आपल्या जिल्ह्यात ही संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे आणि उत्साहाने पार पडेल याची मला खात्री आहे.

- Advertisement -

सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शुक्रवार पासुन जिल्ह्यात ‘ड्राय रन’ मोहिम राबविण्यात सुरु झाली त्यानुसार नाशिक रोड येथील नवीन बिटको हॉस्पिटल मधील कोकोरना सेंटर मध्ये ‘ड्राय रन’ सकाळी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांचे उपस्थित करण्यात आला

यावेळी आरोग्य विभागातील २५ कर्मचाऱ्यांना लस देण्याची चाचणी घेण्यात आली. लाभार्थ्यांला सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करून प्रत्येक लाभार्थ्यांचे निर्जंतुकीकरन करून, तापमान घेण्यात आले. त्याचप्रमाणे दुसऱ्या व्हॅक्सिनेशनच्या रूममध्ये करोना ॲप या ॲप्लिकेशनमध्ये लाभार्थ्याची नोंद करण्यात येवून त्याला लसीकरणाची संपूर्ण माहिती दिली जात होती.

त्यांनतर लसीकरण करण्यात आले. लसीकरण झाल्यावर तिसऱ्या ऑबझरव्हेशन रूममध्ये लाभार्थ्यांला तीस मिनिट परिक्षणासाठी बसविण्यात येवून काही दुष्परिणाम होत आहे का, या साठी त्या नागरिकाला एक तास देखरेखीखाली ठेवण्यात येत आहे,नंतर त्यांना घरी सोडण्यात आले.

यावेळी आरोग्य अधिकारी बापूराव नागरगोजे, करोना कक्ष अधिकारी डॉ आवेश पलोड, अतिरिक्त आयुक्त प्रविण अष्टेकर, विभागीय अधिकारी डॉ. दिलीप मेनकर, डॉ.जितेंद्र धनेश्‍वर, डॉ. पर्शांत शेटे, नगरसेवक जगदीश पवार, रमेश धोंगडे आदी अधिकारी उपस्थितीत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या