Saturday, April 27, 2024
HomeनाशिकNashik News : शहराला नवे दहा निरीक्षक मिळणार; केवळ अकार्यकारी पदांवरच नियुक्तीची...

Nashik News : शहराला नवे दहा निरीक्षक मिळणार; केवळ अकार्यकारी पदांवरच नियुक्तीची शक्यता

नाशिक। प्रतिनिधी | Nashik

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिस दलातून (Nashik City Police Force) दहा वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्यानंतर त्यांच्या जागी नाशिकमध्ये आता नव्याने दहा निरीक्षक दाखल होणार आहेत. या सर्वच निरीक्षकांना आयुक्तालयाच्या अकार्यकारी पदांवरच कार्यरत रहावे लागण्याची शक्यता असून पाेलिस आयुक्त संदीप कर्णिक (Police Commissioner Sandeep Karnik) हे नवीन अधिकाऱ्यांना कार्यकारी पदांवर नेमू शकतात, अशी चर्चा आहे. सध्या केवळ अकार्यकारी पदे रिक्त असल्याने संबंधितांना तेथील ‘प्रभारी’ पदांची जबाबदारी मिळू शकते…

- Advertisement -

आठवडाभरापूर्वी राज्य पोलिस दलातील १२९ पोलिस निरीक्षक, ७३ सहायक निरीक्षक आणि २१२ उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित करण्यात आले. त्यामध्ये नाशिक शहरातील दहा निरीक्षक, बारा सहायक निरीक्षक,एकोणवीस उपनिरीक्षकांचा समावेश हाेता. त्यानुसार पिंपरी चिंचवड येथील पोलिस निरीक्षक संजय तुंगार यांची ‘एमपीए’, पिंपरी चिंचवडचे बडेसाब नाईकवाडे, पुण्यातील जयराम पायगुंडे, अंकुश चिंतामण, जगन्नाथ जानकर, ठाण्यातील समाधान चव्हाण, श्रीनिवास देशमुख, छत्रपती संभाजीनगरातील आम्रपाली तायडे, गणेश ताठे, अशोक गिरी, सुशील जुमडे या सर्वांची नाशिक शहर आयुक्तालयात बदली करण्यात आली.

दरम्यान, हे सर्वजण पुढील काही दिवसांत नाशिकमध्ये हजर होऊ शकतात. सध्या नाशिक शहरातील गुन्हे शाखा, विशेष पथक, विशेष शाखा, अभियोग कक्ष, आर्थिक गुन्हे या अकार्यकारी विभागातील पोलिस निरीक्षकांचीच पदे रिक्त आहेत. त्यामुळे नव्याने हजर होणाऱ्या निरीक्षकांना (inspectors) अकार्यकारी पदे मिळणार की, पोलिस ठाण्यांच्या ‘प्रभारी’त पुन्हा फेरबदल होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या