Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यागणेशोत्सवातील शांतता पटर्न; मंडळाचे कार्यकर्तेच 'विशेष पोलीस अधिकारी'

गणेशोत्सवातील शांतता पटर्न; मंडळाचे कार्यकर्तेच ‘विशेष पोलीस अधिकारी’

नाशिक । प्रतिनिधी

करोना असला तरी अनेक मंडळांनी साधेपणाने का होईना गणेशोत्सव साजरा केला आहे. कोणत्याही ठिकाणी गर्दी होवू नये तसेच इतर काळजी घेतली जावी या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिसांनी भन्नाट आयडिया लढवली आहे…

- Advertisement -

शहर पोलीस दलाने सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांना विशेष पोलिस अधिकारी केले आहे. त्यांच्या समन्वयाची जबाबदारी स्थानिक पोलिस ठाण्याकडे देण्यात आली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर गणरायाचे स्वागत थोडे थंड झाले असले तरी कार्यकर्त्यांचा उत्साह मावळलेला नाही.

सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या गत वर्षाच्या तुलनेत कमी आहे. परंतु तरिही सुमारे 150 पेक्षा अधिक मंडळांनी साधेपणाने गणोत्सव केला आहे. या सर्व मंडळांकडे काही भाविक भक्त तसेच काही प्रमाणात कायकर्ते हजेरी लावतात.

शहरात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 70 टक्के मंडळे कमी झाली. गर्दी होणार नाही हा मागील हेतू आहे.

मात्र, छोटे मोठे आणि मौल्यवान मिळून यंदाची संख्या दीडशेच्या घरात पोहचली आहे. यात 13 मौल्यवान गणेश मंडळांचाही समावेश आहे.

मंडळांच्या मंडपाचा आकारही छोटा आहे. दरवर्षी गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था सांभाळणार्‍या पोलिसांना डोळ्यात तेल घालून काम करावे लागते. यंदा गणेश मंडळाची संख्या आटोक्यात असल्याचा फायदा होत आहे.

दरम्यान, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी गणेश मंडळाच्या पदाधिकार्‍यांना विशेष पोलिस अधिकारी म्हणून नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष पोलिस अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येणार्‍या पदाधिकार्‍यांना सोशल डिस्टन्सिंग, मुर्ती वा मंडपाची काळजी घ्यावी लागणार आहे.

या विशेष पोलिस अधिकार्‍यांच्या समन्वयाचे काम स्थानिक पोलिस ठाण्यामार्फत केले जात आहे. विशेष पोलिस अधिकारी नियुक्त करण्याचा उपक्रम करोनाच्या पहिल्या टप्प्यात राबविण्यात आला होता.

सोसायट्यांचे अध्यक्ष तसेच सचिवांनाच विशेष पोलीस अधिकारी नेमण्यात आले होते. त्याचा चांगला परिणाम त्यावेळी झाला होता. गणेशोत्सवात सुद्धा हे विशेष पोलिस अधिकारी मदत करतील, अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या