नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा येत्या ४ जानेवारी २०२१ पासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

प्रशासनाला शाळा सुरु करण्याबाबत निर्देश त्यांनी दिले असून योग्य ती पूर्वतयारीला लागण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत.

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु असलेल्या एका बैठकीला ते संबोधित करत आहेत. यावेळी त्यांनी शाळा सुरु करण्याबाबतच्या सूचना केल्या आहेत.

यामध्ये केवळ ९ वी ते १२ वी च्या शाळा सुरु होणार आहेत. इतर इयत्तेच्या शाळा मात्र कधी सुरु होणार याबाबत अद्याप पालकमंत्र्यांनी सांगितले नाही.

सविस्तर वृत्त लवकरच...