नाशिककरांसाठी आणखी 'इतक्या' बसेस वाढणार

नाशिककरांसाठी आणखी 'इतक्या' बसेस वाढणार

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिककरांचा बससेवा उदंड प्रतिसाद लाभत आहे. सुरुवातीपासूनच नव्या कोऱ्या बसेसकडे नाशिककरांची ओढ आहे. सुरुवातीला ट्रायल बेसिसवर ९ बस शहरातील विविध मार्गांवर धावत होत्या. यानंतर प्रतिसाद बघून ५१ बसेस पूर्णवेळ नाशिककरांच्या सेवेत दाखल करण्यात आल्या. यांनतर लॉकडाऊनपूर्णपणे शिथिल झाल्यामुळे अनेक मार्गांवर प्रवासी वाढले आहेत. म्हणून बसेस वाढवण्याची मागणी होत होती. यामुळे आता शहरात २५ बसेस वेगवेगळ्या मार्गांवर धावणार आहेत...(NMC Bus service huge response by nashikites)

त्यामुळे आता एकूण ७६ बसेस नाशिककरांना सेवा देणार आहेत. सध्या शहरात 51 बस रस्त्यावर धावत आहेत आता नव्याने या 25 बस सुरू करून दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी परिवहन समितीकडून सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे.

त्याचबरोबर सध्या असलेल्या व वाढीव बसेस यांना सीएनजीचा (CNG Shortage) तुटवडा होऊ नये म्हणून 1 सप्टेंबर पासून आडगाव परिसरात सीएनजीचा नवीन पंप (Adgaon cng pump) कार्यान्वयित करण्यात येणार असल्याची माहिती समितीच्या बैठकीत देण्यात आली.

बस सेवा सुरू झाल्यानंतर परिवहन समितीची आज ( दि. 27 ) पहिल्यांदाच बैठक मनपा आयुक्त कैलास जाधव (NMC Commissioner Kailas Jadhav) यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

यावेळी महापौर सतीश कुलकर्णी (Mayor Satish Kulkarni), स्थायी समिती सभापती गणेश गीते (Ganesh Gite), भाजप गटनेते अरुण पवार (Arun Pawar), सभागृहनेते कमलेश बोडके (Kamlesh Boadke) यांच्यासह परिवहन समितीचे संचालक व सिटीलींक (Citilink) चे अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com