नाशिकमधील ‘त्या’ बैलगाडा शर्यतीला परवानगी नव्हती; कारवाई होणार

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | प्रतिनिधी Nashik

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बैलगाडा शर्यतीला (Bullock cart race) परवानगी दिल्यानंतर नाशिकच्या ओझरमध्ये (Ojhar Nashik) आज बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. २१ हजारांचे रोख बक्षीसदेखील या शर्यतीला ठेवण्यात आले होते…

Video : नाशिकमध्ये आज रंगतेय बैलगाडा शर्यत; संपूर्ण राज्याचे लक्ष

मात्र, कुठलीही शर्यत आयोजित करण्याआधी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असताना ही शर्यत विनापरवानगी झाल्याचे जिल्हाधिकरी सुरज मांढरे (Collector Suraj Mandhare) यांनी म्हटले आहे. दरम्यान, सहायक जिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी या घटनेप्रकरणी कारवाई करत असल्याची माहिती जिल्हाधिकारी मांढरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

सर्वोच्च न्यायालयाने शर्यतीला परवानगी ही सशर्त स्वरुपात दिलेली आहे. कुठलीही शर्यत आयोजित करताना वेगवेगळ्या प्रक्रियेतून आयोजकांना जावे लागते. या स्पर्धेसाठी पोलीस (Nahsik rural Police) आणि प्रशासनाची परवानगी घेतली नाही त्यामुळे कारवाई करणे क्रमप्राप्त असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले.

आजच्या शर्यतीकडे सबंध महाराष्ट्राचे लक्ष लागून होते. कारण सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर नाशिकमध्ये पहिल्यांदाच शर्यत होणार होती. पंचक्रोशीतील शेकडो बैलजोड्या या स्पर्धेसाठी दाखल झाल्या.

शर्यतीसाठी आलेल्या अनेकांनी शर्यत सुरु झाल्यामुळे आनंद व्यक्त केला होता. परंतु, शर्यतीचे आयोजन विनापरवानगी झाल्यामुळे स्पर्धेसाठी आलेल्या अनेकांचा हिरमोड झाला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *