Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनाशिक लॉकडाऊन शिथिल : शैक्षणिक, हार्डवेअर, इलेक्ट्रीकल्स दुकानांसंदर्भात हा निर्णय

नाशिक लॉकडाऊन शिथिल : शैक्षणिक, हार्डवेअर, इलेक्ट्रीकल्स दुकानांसंदर्भात हा निर्णय

नाशिक

नाशिकमधील लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे आता अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ वाजेपासून दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. तर दुपारी ३ वाजेपासून दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेत मोडत नसलेल्या काही व्यवसायांना परवानगी देण्यात आली आहे.

- Advertisement -

नव्या ‘ब्रेक द चेन’चे काय आहेत नियम जाणून घ्या

अत्यावश्यक सेवेत मोडत नसलेल्या काही व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यात खालील व्यवसायांचा समावेश आहे.

१) बांधकाम क्षेत्राची ठिकाणे

२) शैक्षणिक वह्या पुस्तके व स्टेशनरी दुकाने

३) हार्डवेअर

४) इलेक्ट्रीकल्स साहित्य दुकाने

५) घर दुरुस्तीचे साहित्याची दुकाने

शासकीय कार्यालयात २५ टक्के उपस्थिती

कॉविड- 19 व्यवस्थापनाशी निगडीत नसलेल्या सर्व शासकीय कार्यालयामध्ये 25% उपस्थिती राहणार आहे. यामुळे आता शासकीय कामांना सुरुवात होणार आहे.

कृषी साहित्यांची दुकाने सुरु राहणार

जून महिन्याच्या सुरुवातीला आता शेतीच्या कामांना वेग येणार आहे. यामुळे कृषी विषयक साहित्याची दुकाने सकाळी 07.00 ते दुपारी 02.00 या वेळेत सुरु राहतील.

हॉटेल्समध्ये केवळ पार्सल

सर्व ढाबे व हॉटेल्स आणि सर्व आस्थापना पार्सल सुविधेसाठी सकाळी 07.00 ते सायंकाळी 07.00 या वेळेत सुरु राहतील. तथापि मद्य दुकाने, आस्थापना शासनाने ठरवून दिलेल्या दिवशीच सुरु राहतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या