Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक झाले निर्बधमुक्त

नाशिक झाले निर्बधमुक्त

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

गेल्या दोन वर्षांपासून करोना महामारीमुळे (Corona epidemic) कधी पूर्ण तर कधी थोड्या प्रमाणात निर्बंध (Restrictions) असलेले शहर आज शंभर टक्के खुले झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा जिल्हाधिकारी गंगाथरण डी. (Disaster Management Head and Collector Gangatharan D.) यांनी आज (दि.19) रोजी काढलेल्या आदेशात शहर निर्बंधमुक्त (Restrictions free) करत असल्याचे सांगितले.

- Advertisement -

उर्वरित जिल्ह्याने राज्य शासनाचे (state government) निकष पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे, जेणेकरून जिल्हा निर्बंधमुक्त होऊन व्यवहार सुरळीत होतील. दरम्यान,आदेशात म्हटल्यानुसार, नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation) कार्यक्षेत्रातील करोना रुग्णांची संख्या (Number of corona patients) ही अत्यल्प असून उपचार घेत असलेली रुग्णसंंख्या मागील 3 आठवड्यांपासून 60 पेक्षा कमी आहे. 01 मार्चपासून आजपर्यंत एकही करोना बाधिताचा मृत्यू झालेला नाही.

नाशिक महापालिका कार्यक्षेत्रात मार्गदर्शक सुचनांनुसार करोना चाचणी (Corona test) करण्यात येत असून करोना बाधितांचे प्रमाण नगण्य आहे. तसेच नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये 18 वर्षांवरील नागरिकांचा लसीकरणाचा (vaccination) पहिला डोस 95% व दुसरा डोस 75% झालेला असून 15 ते 18 वयोगटातील 65 % नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.

दरम्यान,काल (दि.18) झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत (District Disaster Management Authority meeting) नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील करोना निर्बंधांमध्ये पूर्णपणे शिथिलता (Complete relaxation in corona restrictions) प्रदान करण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 23 मार्च 2020 रोजी पूर्ण टाळेबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर जसजशी रुग्णसंख्या कमी अधिक होत होती तसतसे निर्बंध शिथिल आणि कठोर केले जात होते.आज घेण्यात आलेल्या निर्णयात शहर पूर्णपणे निर्बंधमुक्त करण्यात आले आहे.

नाशिक शहराचा कोविड लसीकरण टप्पा पार झाल्याने शहर निर्बंधमुक्त झाले आहे. ग्रामीण भागातही लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी सूचना दिलेल्या असून लवकरच जिल्हा देखील निर्बंधमुक्त होणार आहे.

– छगन भुजबळ, पालकमंत्री

- Advertisment -

ताज्या बातम्या