Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याAPMC Election Result : नाशिक बाजार समितीवर पिंगळेचं ठरले किंग; कुणाला किती...

APMC Election Result : नाशिक बाजार समितीवर पिंगळेचं ठरले किंग; कुणाला किती जागा? वाचा सविस्तर

नाशिक | Nashik

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचा (Nashik APMC Election) निकाल आज जाहीर झाला. यात पिंगळे गटाने चुंभळे गटावर मात करत विजयी गुलाल उधळला. नाशिक कृउबा समितीच्या १५ जागांसाठी काल ९६.३४ टक्के मतदान (Voting) झाले होते. त्यानंतर आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचारी संघटनेच्या सभागृहात मतमोजणी पार पडली…

- Advertisement -

नाशिक बाजार समितीच्या १५ जागांसाठी एकूण ३७ उमेदवार रिंगणात होते. तर तीन जागा अगोदरच बिनविरोध झाल्या आहेत. त्यानंतर माजी सभापती देवीदास पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील ‘आपलं पॅनल’ आणि माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी पॅनलमध्ये चुरशीची लढत झाली. यात पिंगळे गटाला ९ तर चुंभळे गटाला ६ जागा मिळाल्या आहेत.

APMC Election 2023 : नाशिक बाजार समिती : ‘हे’ उमेदवार आघाडीवर; थोड्याच वेळात निकाल येणार हाती

यामध्ये सोसायटी सर्वसाधारण गटाच्या ११ पैकी सात सर्वसाधारण जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात होते. यात शेतकरी विकास पॅनलचे शिवाजी चुंभळे यांनी ७५४ मते घेत पहिला तर राजाराम धनवटे यांनी ६९० मते घेत दुसरा क्रमांक मिळवत विजय संपादन केला. तसेच आपलं पॅनलचे देविदास पिंगळे यांनी ६७६ मते घेत तिसरा तर संपतराव सकाळे यांनी ६२१ मते घेत चौथा क्रमांक मिळवत यश संपादन केले आहे.

APMC Election Result : संगमनेर बाजार समितीवर थोरातांचे निर्विवाद वर्चस्व, विखे गटाचा धुव्वा

याबरोबरच आपलं पॅनलचे युवराज कोठुळे यांना ५९८ मते मिळाली असून त्यांना पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. तर शेतकरी विकास पॅनलचे तानाजी करंजकर हे ५९२ मते मिळवत विजयी झाले असून त्यांना सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तसेच आपलं पॅनलचे उत्तम खांडबहाले यांना ५७० मते मिळाली असून त्यांना सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.

APMC Election 2023 : मालेगाव बाजार समितीवर कर्मवीर पॅनलची सत्ता; पालकमंत्र्यांच्या वीस वर्षाच्या सत्तेला हादरा

तर सोसायटी इतर मागासवर्गीय गटातून शेतकरी पॅनलचे धनाजी पाटील हे ६१२ मते मिळवून विजयी झाले. तसेच सोसायटी विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून शेतकरी पॅनलचे प्रल्हाद काकड हे ७०१ मते मिळवत विजयी झाले. याशिवाय सोसायटी महिला गटातून शेतकरी पॅनलच्या कल्पना चुंभळे तर आपलं पॅनलच्या सविता तुंगार विजयी झाल्या असून त्यांना अनुक्रमे ७१२ व ६११ मते मिळाली.

APMC Election Result : लासलगाव बाजार समितीत थोरे गटाची सरशी

यासोबतच ग्रामपंचायत सर्वसाधारण गटामधून आपलं पॅनलचे विनायक माळेकर आणि जगन्नाथ कटाळे विजयी झाले असून त्यांना अनुक्रमे ९९२ व ९५६ मते मिळाली आहेत. तसेच ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल गटातून निर्मला कड विजयी झाल्या असून त्यांना ८९९ मते मिळाली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या