नाशिक विमान सेवा पुन्हा सुरु; 'या' विमान सेवा राहणार सूरळीत

नाशिक विमान सेवा पुन्हा सुरु; 'या' विमान सेवा राहणार सूरळीत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मागिल 13 दिवसांपासून दूरुस्तीसाठी बंद असलेले ओझर विमानतळ (Ozar Airport) रविवार (दि. 4) पासून विमान वाहतूकीसाठी पुन्हा खुले होणार आहे. स्पाइस जेटच्या (Spice Jet) नाशिक - दिल्ली (Nashik - Delhi) आणि हैदराबाद (Hyderabad) सेवा पूर्ववत सुरू होणार आहेत.

दरम्यान, स्पाइस जेट ने अहमदाबाद सेवा सुरू करावी, यासाठी पाठपुरावा सुरू असून, त्या दृष्टीने मध्यंतरी यासंदर्भात बैठक देखील झाली आहे. मात्र निर्णय झालेला नाही. नाशिकमध्ये उडान योजनेंतर्गत सुरू असलेल्या विमान सेवा (Aviation services) जवळपास बंद झाल्या असून, केवळ स्पाइस जेटची नाशिक-दिल्ली आणि नाशिक-हैदराबाद या दोन शहरांना जोडणारी विमानसेवाच सुरू होती.

मात्र, ओझर विमानतळ 13 दिवस बंद असल्याने अडचण निर्माण झाली आणि स्पाइस जेटची विमान सेवाही ठप्प झाली. दिवाळीच्या दरम्यान स्टार एअरची नाशिकमधील (nashik) विमान सेवा ठप्प झाल्यानंतर बराच आरडाओरडा झाला होता. त्यानंतर माजी पालकमंत्री छगन भुजबळ (Former Guardian Minister Chagan Bhujbal) यांनी केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Union Civil Aviation Minister Jyotiraditya Scindia) यांना पत्र लिहिले होते. मुख्यमंत्र्याकडे नाशिक संदर्भात खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांनी बैठक घेऊन या प्रश्नावर लक्ष घालण्यास सांगितले होते.

शासनाने शंभर कोटी रुपये खर्च करून हे टर्मिनल उभारले आहे. बेळगाव विमान सेवा, तर अलायन्स एअरची दिल्ली अहमदाबाद, नाशिक- पुणे- बेळगाव ही सेवा 1 नोव्हेंबरपासून ठप्प होती. त्यामुळे विमान प्रवास करणार्‍यांची धावपळ झाली होती. नाशिककरांना विमानसेवेसाठी मुंबई आणि शिर्डीला जावे लागत होते. किमान दिल्ली आणि हैदराबाद विमान सेवा सूरू राहण्यातून प्रवाायांना शिर्डीला जाण्याची धावपळ वाचणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com