
जानोरी | वार्ताहर
नाशिक- अहमदाबाद विमानसेवा पुन्हा सुरू झाली असल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. विमानतळ प्रशासनानेही नाशिक अहमदाबाद विमान सेवेचा लाभ घेण्यासाठी आव्हान केले आहे.
नाशिक विमानतळावरून नाशिक अहमदाबाद ही विमानसेवा मागील १० जुलै २०२० पासून बंद झाली होती. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती.
परंतु विमानसेवा पुन्हा ५ सप्टेंबरपासून सुरु झाल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केला असून विमानतळ प्रशासनानेही या विमान सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
असे आहे वेळापत्रक
विमान सायं.६ वा ३० मिनिटांनी अहमदाबाद येथून निघेल
नाशिक विमानतळावर सायं ७.वा.४५ मिनिटांनी पोहोचेल
नाशिक विमानतळावरून रात्री ८ वा. २० मिनिटांनी निघेल
अहमदाबादला रात्री ९.वा. ३५ मिनिटांनी पोहोचेल