
दहिवड | वार्ताहर | Dahiwad
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील देवळा तालुक्यातील चिंचवे शिवारात आज अर्टिगा कारच्या झालेल्या अपघातात वऱ्हाळे येथील एकाचा मृत्यू तर सौंदाणे येथील एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे...
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, देवळा तालुक्यातील चिंचवे शिवारात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर नाशिकहून मालेगावच्या दिशेने येणाऱ्या एम. एच. 48 एस. 6238 या अर्टिगा गाडीवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी विरुद्ध बाजूच्या दिशेला जाऊन धडकली.
त्यात वर्हाळे येथील गाडी चालक भावेश अविनाश गोसावी (24) यांचा मृत्यू झाला तर सौंदाणे येथील भैय्या पवार हे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातात गाडीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अपघात घडल्याची माहिती मिळताच चिंचवे ग्रामस्थांनी घटनास्थळी येऊन मदतकार्य केले. अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.