लाचखोरीत नाशिक राज्यात तिसरे
मुख्य बातम्या

लाचखोरीत नाशिक राज्यात तिसरे

करोनाच्या सावटात विभागात ४४ जण जाळ्यात

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यासह जगभरात करोनाचे सावट असतानाही लाचखोरी मात्र जोरात सुरू आहे. राज्यभरात गेली सात महिन्यात ३२९ शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना लाच घेताना पकडण्यात आले आहे. यामध्ये नाशिक विभागहा तिसर्‍या स्थानावर आहे. चालू वर्षी मार्च पासून राज्यासह जगभरात करोना विषाणुकचा कहर सुरू झाला आहे.

करोनाच्या भितीचे सावट सर्वत्र असल्याने अनेक कार्यालयांमध्ये मोजके कर्मचारी कार्यरत आहेत. असे असतानाही लाचखोरांचे प्रमाण मात्र मोठे आहे. चालू वर्षीही लाचखोरीत नाशिक राज्यात तिसर्‍या क्रमांकावर आहे.नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आतापर्यंत ४४ लाचखोरांना जेरबंद केले आहे.

पुणे विभाग ८४ लाचखोर पकडून प्रथम क्रमांकावर आहे. ४५ लाचखोर पकडून नागपूर विभाग दुसर्‍या तर एकच्या फरकाने ४४ लाचखोर जेरबंद करत नाशिक विभाग तिसर्‍या स्थानी आहे. राज्यात ३२९ सापळे यशस्वी करून ४५८ संशयितांना अटक करण्यात आली आहे. तर नाशिक विभागात ४४ सापळे यशस्वी करताना ५७ संशयितांना जेरबंद करण्यात आले आहे. तर ३ अपसंपदेचे गुन्हे दाखल करण्यात आले असून ६ जणांना अटक करण्यात आली आहे.

नाशिक विभागात सर्वाधिक १३ सापळे अहमदनगर जिल्ह्यात यशस्वी झाले. तर नाशिक जिल्ह्यात १०, जळगाव ११, धुळे ६, नंदुरबार ४ असे सापळे यशस्वी झाले आहेत. अहमनगर पाठोपाठ जळगाव येेथे अधिक लाचखोरी झाल्याचे स्पष्ट होत आहे. लाचखोरीत भुमीअभिलेख, महसुल विभागात सर्वात आघाडीवर आहेत. यानंतर पोलीस व इतर विविध खातील अधिकार्‍यांचा क्रमांक लागत आहे.

करोनाचे सावट असल्याने अनेक विभागांमध्ये कामकाज मोजक्या कर्मचार्‍यांवर होत आहे. अशातही शेतकरी तसेच गरीब नागरीकांची लूट हे अधिकारी करत आहेत. लाचखोरी तसेच अपसंपदेबद्दल नागरीकांनी तात्काळ नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी १०६४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्पाय अ‍ॅप घेऊ नका

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोरांना जेरबंद करण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत. परंतु यामध्ये जागृक नागरीक तसेच पिडीत व्यक्तीने निर्भीडपणे पुढे येण्याची गरज आहे. तक्रारदाराचे नाव तसेच माहिती गोपनिय ठेवूनच सापळे रचले जात असल्याने नागरीकांनी पुढे यावे

- सुनिल कडसाने, अधीक्षक नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com