नाशिक : बांधकाम साईटवर बिगाऱ्याकडून वॉचमनचा खून

नाशिक : बांधकाम साईटवर बिगाऱ्याकडून वॉचमनचा खून

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

बहिणीकडे वाईट नजरेने बघितले म्हणून म्हसरूळ (Mhasrul) परिसरातील एका बांधकामाच्या साइटवर वॉचमन आणि बिगारी यांच्यात झालेल्या हाणामारीत वॉचमनचा मृत्यू झाल्याची घटना घडली....

याबाबत सविस्तर वृत्त असे की, संशयित योगेश पंढरीनाथ डंबाळे (२७,रा. ननाशी) हा म्हसरूळ परिसरातील वाढणे कॉलनीतील हनुमान मंदिराजवळील एका बांधकाम साइटवर बिगारी म्हणून काम करत होता.

या साइटवर सतलाल मुकूरी प्रसाद (४०, रा. नाहर छापला पडरोना, कुशीनगर, उत्तर प्रदेश) वॉचमन म्हणून काम करत होते. दरम्यान (दि.3) रात्रीच्या वेळी बिगारी योगेश डंबाळे हा दारू पिऊन येऊन सतलाल याला माझ्या बहिणीकडे वाईट नजरेने का बघतो ? असा सवाल करत त्याने सतलालच्या तोंडावर जोरदार फटका मारला.

या हाणामारीत सतलाल खाली पडून त्याच्या डोक्याला इजा झाली. त्यानंतर तो घरी जाऊन झोपला असता सकाळी त्याला बघितल्यावर तो मृत अवस्थेत आढळला. यावरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात योगेश डंबाळे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com