Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याऑक्टोबरपासून मुलांनाही कोरोनाची लस मिळणार, या मुलांचे आधी लसीकरण

ऑक्टोबरपासून मुलांनाही कोरोनाची लस मिळणार, या मुलांचे आधी लसीकरण

नाशिक

झायडस कॅडिला या कंपनीची कोरोना लस झायकोव -डीला ( ZyCov-D ) भारतात आपत्कालीन वापरसाठी परवानगी मिळाली आहे. ZyCoV-D लसीने सुरक्षिततेचे सर्व निकष पूर्ण केल्यामुळे डीजीसीआयने हा निर्णय घेतला आहे. ही लस पूर्णपणे स्वदेशी असून डीएनएवर आधरित असणारी जगातील पहिली लस आहे. ऑक्टोबरपासून मुलांचं लसीकरण (Corona Vaccination) केले जाईल. यामध्ये गंभीर आजार असलेल्या मुलांची यादी तयार केली जाईल. या मुलांना सर्वात आधी लस मिळेल.

- Advertisement -

मनपा निवडणुकीचा बिगुल : जाणून घ्या, एक सदस्यीय प्रभाग रचनेचा फायदा कोणाला?

ही लस १२ वर्षाच्या पुढील मुलांना देण्यात येणार आहे. ही लस सुईद्वारे देण्यात येत नाही. नाशिकमधील ४ लाख मुले या लसीसाठी पात्र आहे. विशेष म्हणजे नाशिकमधील ३०० मुलांवर या लसींची चाचणी करण्यात आली. शहरातील मानवता कर्करोग रुग्णावर ही चाचणी झाली. या ३०० मुलांवर लसींचे कोणतेही दुष्परिणाम झाले नाही.

देशात झायडस कॅडिला लसीची चाचणी देशातील २८ हजार पेक्षा जास्त स्वयंम सेवकांवर करण्यात आली आहे. या चाचणीत ही लस ६६.६ टक्के प्रभावशाली असल्याचे आढळून आले आहे. ही लस २ डिग्री ते ८ डिग्री तापमानापर्यंत साठवता येते. झायडस कॅडिला कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शरवील पटेल यांनी सांगितले की त्यांच्या कंपनीच्या लसीचे या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत ३ ते ४ कोटी डोस तयार झालेले असतील.

गंभीर आजार असलेल्या मुलांना प्राधान्य

12 ते 17 वयोगटात 12 कोटी लहान मुलं आहेत. निरोगी मुलांमध्ये गंभीर आजार किंवा मृत्यूची शक्यता नगण्य आहे. 18-45 वयोगटातील लोकांना गंभीर आजार होण्याची शक्यता 10 ते 15 टक्के जास्त असते. गंभीर आजार(Comorbidity) असलेल्या मुलांची चिंता आहे म्हणून त्यांना लसीकरणात प्राधान्य देण्यात येणार आहे.

लसीचे तीन डोस

सप्टेंबरपासून लसीचे डोस पुरवण्यास सुरुवात होईल. ही लस तीन डोसची आहे. पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोस २८ दिवसांनी आणि तिसरा डोस ५६ दिवसांनी देण्यात येणार आहे.

डेटानुसार, Zycov-D ची लस १२ ते १८ वर्षांमधील मुलांसाठी प्रभावी आहे. कंपनीने दरवर्षी १० ते १२ कोटी लस निर्माण करण्याची तयारी केली आहे. कोविड वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एनके अरोडा यांनी सांगितलं की, झायडस कॅडिलाच्या लशीची चाचणी जवळपास पूर्ण झाली आहे. जुलैच्या शेवटापर्यंत किंवा ऑगस्ट महिन्यात १२ ते १८ वर्षांमधील लहान मुलांना कोरोना प्रतिबंधक लस मिळण्यास सुरु होईल.

काय आहे फार्माजेट तंत्र

झायडस कॅडिला ZyCoV-D कोरोना व्हॅक्सीन १२ से १८ वर्ष वयाच्या मुलांसाठी सुरक्षित आहे. ही फार्माजेट म्हणजेच सुई विरहीत (PharmaJet needle free applicator) च्या मदतीने दिली जाणार आहे. या प्रकरात सुई नसणाऱ्या इंजेक्शनमध्ये औषध भरली जाते. त्यानंतर त्याला मशीन लावून ती हातावर लावली जाते. मशीनवरील बटन क्लिक करुन औषध शरीरात टाकले जाते.

दरम्यान, भारतात आतापर्यंत चार लशींच्या वापराला परवानगी मिळाली आहे. यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोवॅक्सिन, रशियाची स्पुटनिक ५ आणि अमेरिकीची मॉडर्ना या लशींचा समावेश आहे. झायडस कॅडिलाच्या लशीला आपत्कालीन वापरास परवानगी मिळाल्यास ती पाचवी लस ठरु शकते. शिवाय यामुळे लसीकरणाच्या मोहिमेला गती मिळू शकते. भारतात आतापर्यंत ३३ कोटींपेक्षा अधिक लोकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस मिळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या