Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकची २१ धरणं १०० टक्के भरली; जिल्ह्यातील धरणसाठा 'इतका'

नाशिकची २१ धरणं १०० टक्के भरली; जिल्ह्यातील धरणसाठा ‘इतका’

नाशिक | Nashik

नाशिक जिल्ह्यातील धरणात ९६ टक्के जलसाठा झाला आहे. (96 percent water storage in nashik dams) जिल्ह्यातील २४ मोठ्या आणि मध्यम प्रकल्पातील तब्बल २१ धरणात १०० टक्के जलसाठा सद्यस्थितीत असल्यामूळे समाधान व्यक्त केले जात आहे. १३ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरु असल्यामुळे धरणातून तीन हजार ते ४० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे…

- Advertisement -

गंगापूर धरण समूहात (Gangapur Dam water catchment area) असलेल्या गंगापूर(Gangapur), कश्यपी (Kashyapi), गौतमी गोदावरी (Gautami Godavari) आणि आळंदी धरणात (Alandi Dam) सद्यस्थितीत १०० टक्के जलसाठा आहे. यामध्ये आळंदी धरणातून आताच्या घडीला ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

दुसरीकडे पालखेड धरणही (Palkhed Dam) १०० टक्के भरले असून ८७४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या होत आहे. तर करंजवण धरण (Karanjwan Dam) ९६ टक्के भरले आहे. वाघाड धरणही (Waghad Dam) १०० टक्के भरले असून ५०५ क्युसेक पाण्याचा विसर्ग त्यातून होत आहे.

यानंतर ओझरखेडमध्ये (Ozarkhed Dam) ८७ टक्के जलसाठा आहे. तर पुणेगाव (Punegaon Dam) आणि तिसगावमध्ये (Tisgaon) प्रत्येकी ८७ आणि ९९ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

तिकडे इगतपुरी तालुक्यातील दारणा धरण (Darna Dam) १०० टक्के भरले असून ५५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. भावलीतही सद्यस्थितीत (Bhavali Dam) १०० टक्के जलसाठा आहे. मुकणे धरणात (Mukane Dam) ७६ टक्के जलसाठा आहे. वालदेवी धरणात (Waldevi Dam) १०० टक्के जलसाठा असून ६५ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

कडवा धरण (Kadwa Dam) १०० टक्के भरले आहे. नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून (nandur madhyameshwar dam) ३ हजार १५५ क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरीत होत असून बंधाऱ्यात सद्यस्थितीत ८९ टक्के जलसाठा आहे. तर भोजपूरमध्ये ५९ टक्के जलसाठा आहे.

दरम्यान, मोसम खोरे (Mosam khore) संबोधले जाणाऱ्या धरणांत सद्यस्थितीत १०० टक्के जलसाठा आहे. यात चणकापूर, हरणबारी, केळझर, नागसाक्या, गिरणा आणि पुनद धरणाचा समावेश आहे.तिकडे माणिकपुंज धरणही यंदा १०० टक्के भरल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या