नाशिकमधील १२ लहानमोठ्या धरणांतून 'इतका' विसर्ग सुरु; पाहा आकडेवारी

नाशिकमधील १२ लहानमोठ्या धरणांतून 'इतका' विसर्ग सुरु; पाहा आकडेवारी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरात (Nashik City) आज पावसाने उघडीप दिली असली तरीदेखील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात (Water dam catchment area) संततधार पाऊस सुरु आहे. यामुळे आज दुपारच्या आकडेवारीनुसार, तब्बल १२ लहानमोठ्या धरणांच्या प्रकल्पातून सध्या विसर्ग सुरु करण्यात आला आहे....

सर्वाधिक विसर्ग नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून (Nandurmadhyameshwar Dam) होत आहे. सद्यस्थितीत ६५ हजार २७२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्याखालोखाल गंगापूर धरणातून (Gangapur Dam) १० हजार ३० तर पालखेडमधून (Palkhed Dam) ९ हजर ४३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग होता आहे.

गंगापूर धरण (Gangapur Dam) सद्यस्थितीत ६३ टक्के भरले आहे. तर पालखेड धरण ४९ टक्के भरलेले आहे. पावसाने उघडीप दिल्यास हळूहळू विसर्ग कमी करण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. तिकडे गिरणा खोऱ्यात चणकापूर (Chankapur Dam) आणि केळझर धरणातून (Kelzar Dam) पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर पालखेड धरण (Palkhed Dam) समूहातील पालखेड धरणातून ९ हजार ४३४, करंजवन धरणातून १ हजार १५५ तर वाघाडमधून १ हजार १४७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

ओझरखेड धरण (ojharkhed dam) ओव्हरफ्लो झाले आहे. तसेच ओझरखेडच्या पाणलोट क्षेत्रात (water catchment area) पाऊसदेखील ओसरल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे ओझरखेडचा विसर्ग ३ हजार २६१ क्युसेकवर करण्यात आला आहे. पुणेगावमधून उनंदा (unaan river punegaon) नदीत सद्यस्थितीत १ हजार ३०६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तसेच तिसगाव धरण (Tisgaon Dam) ९० टक्के भरले असून येथून विसर्ग अद्याप सुरु करण्यात आलेला नाही.

इगतपुरी तालुक्यातील दारणा धरण (Darna Dam Igatpuri) प्रकल्प ६६ टक्के भरला आहे. या धरणातून दारणा नदीपात्रात सद्यस्थितीत ८ हजार ८४६ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. कडवा धरण (kadava dam) ६९ टक्के भरले असून त्यातून कडवा नदीत ३ हजार ५१७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. २८ टक्क्यावर आलेली जिल्ह्यातील पाण्याची साठवण टक्केवारी ६९ टक्क्यांवर पोहोचल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com