Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याइथेनॉल प्रकल्पासह नासाका सुरू व्हावा

इथेनॉल प्रकल्पासह नासाका सुरू व्हावा

देवळाली कॅम्प । वार्ताहर

नाशिक सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर देण्यासाठी जिल्हा बँकेने देश पातळीवर निविदा प्रक्रिया राबवावी व त्यात 15 वर्षाच्या भाडेपट्यासह एथोनॉल प्रकल्पाचा समावेश करावा जेणे करून सक्षम पार्टी कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी पुढे येईल असे आदेश सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिलेत त्यामुळे कारखाना सभासद व कामगार याच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.

- Advertisement -

नाशिक, सिन्नर, इगतपुरी व त्रंबकेश्वर या चार तालुक्यातील 17 हजार सभासदांच्या मालकीचा कारखाना गत आठ वर्षांपासून आर्थिक अडचणींमुळे बंद आहे, तो पूर्ववत पुर्ण क्षमतेने सुरू व्हावा म्हणून आ. सरोज आहिरे यांच्या सातत्याच्या प्रयत्नामुळे काल मुंबईत मंत्रालयात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. बैठकीत कारखान्याची सध्याची परिस्थिती, आर्थिक बोजा,उपलब्ध ऊस,तसेच उत्पादक शेतकरी व बेरोजगार झालेले कामगार यांवर सविस्तर चर्चा झाली.

यावेळी आ. अहिरे यांनी जिल्हा बँकेच्या वतीने राबविण्यात येणारी भाडेतत्त्वावरील निविदा देश पातळीवर राबवावी जेणे करून साखर व्यवसायात अग्रेसर असणार्‍या संस्था अगर उद्योजक या प्रक्रियेत सहभाग घेऊ शकतील, जिल्हा बँकेचे अधिकारी यांनी सांगितले की बँकेने या पूर्वी कारखाना भाडेतत्त्वावर देणे साठी राबविलेल्या प्रक्रियेत एका ग्रुपने कारखाना चालविण्या साठी घेण्याचा प्रयत्न केला. काही रक्कम बँकेतही भरली पण अटी शर्थी पुर्ण न केल्याने ते रद्द करण्यात आले असे स्पष्ट केले, कारखान्यावर जिल्हा बँकेचा कर्जाचा डोंगर असल्याने तो सरफेशी कायद्या नुसार जप्त करण्यात आला आहे.

कारखान्या ची प्रतिदिन गाळप क्षमता बाराशे मेट्रिक टन आहे. यासाठी कोणी पार्टी पूढे येणार नाही मात्र एथोनॉल प्रकल्प सुरू केल्यास फायदा होईल, तसेच यंत्रसामुग्री धूळखात पडलेली आहे. याबाबत चर्चा झाली.त्यामुळे इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचा नवीन मुद्दा पुढे आल्यास ताकदवान ग्रुप कारखाना भाडे तत्वावर चालविण्यास पुढे येईल कारखान्याची उपलब्ध जमीन, मुबलक पाणी, ऊसाचे वाढीव क्षेत्र लक्षात घेऊन हा कारखाना पुन्हा उर्जितावस्थेला येऊ शकतो असा विश्वास कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला.

बैठकीस देवळाली मतदार संघाच्या आ. सरोज आहिरे, माजी खा. देविदास पिंगळे, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंद कुमार, साखर आयुक्त शेखर गायकवाड, प्रादेशिक सह संचालक (साखर) अहमदनगरचे मिलिंद भालेराव, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्या.मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक अजित देशमुख, एनडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशासक महंमद आरिफ, कार्यकारी संचालक शैलेश पिंगळे, कामगार संघटनेचे अध्यक्ष विष्णुपंत गायखे, कार्याध्यक्ष शिवराम गायधनी, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नामदेवराव बोराडे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या